Friday, 7 July 2017

वीर बाजी पासलकर






शूरवीर बाजी पासलकर


शिवबांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना अनेकांची मदत मिळालीत्यात तरुण सळसळत्या रक्ताची जशी झुंजार तरुण मंडळी होती त्याप्रमाणेच वय,अनुभव आणि तरुणांनाही लाजवतील अशी पराक्रमी वयस्कर जी माणसे होती त्यातील एक भव्य दिव्य व्यक्तिमत्व म्हणजे बाजी पासलकरइतिहासात बाजी पासलकर ह्यांना स्वराज्याचे पहिले सरसेनापती होण्याचे भाग्य लाभलेबाजी पासलकर हे मोझे खोऱ्यातील वतनदारत्यांचे घराणे हे देशमुखीमावळ प्रांतात त्याचा मोठा दरारा होता.शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना अनेकांची मदत मिळालीत्यात तरुण सळसळत्या रक्ताची जशी तरुण मंडळी होती त्याप्रमाणेच वय,अनुभव आणि तरुणांनाही लाजवतील अशी पराक्रमी वयस्कर जी माणसे होती त्यातील एक भव्य डाव्य व्यक्तिमत्व म्हणजे बाजी पासलकर बलदंड शरीर,अक्कडबाज मिशाफौलादी रुंद छाती,तरुणांना लाजवेल आसा पराक्रम करून दाखवण्याची बळकट मनगटाची ताकदत्यामुळे या साठीच्या माणसाला स्वराज्याच्या कामी वळून घ्यावे,त्यांच्याबरोबर मावळ प्रांतातली आणखीही अनेक मंडळी या स्वराज्यकार्यात मदत करतील असा शिवरायांना जो जेष्ठांकडून सल्ला मिळाला,त्यानुसार राजांनी एक पत्र लिहून ते बाजी पासलकर ह्यांना पाठवले.
पत्र वाचून बाजींच्या मनातील शिवबांबद्दल आदर दुणावलावयाच्या अवघ्यां सोळा सतरावा वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न शिवबा पाहत होतेया देव,देश आणि धर्म कार्याला मदत करावीशिवबाच्या विनम्र आमंत्रणाचा स्वीकार करावा,आपण जर त्यांच्या मागे उभे राहिलो तर इतर मंडळी हि या कामी पुढे येतील,असा विचार करूनत्या पत्राचा शिवबाचा मान राखत स्वतः बाजी पासलकरांनी येऊन पुणे मुक्कामी त्यांची भेट घेतली.


इतकच नव्हे तर पंतांच्या इच्छेचा,शिवबाच्या विनंतीचा,मासाहेबांचा आज्ञेचा मान राखत बाजी पासलकर ह्यांनी या स्वराज्यस्थापनेच्या कामी शिवरायांना मदत करण्याचा शब्द दिलाबाजी नुसता शब्द देऊनच थांबले नाहीत तर त्यांनी अनेक मोठे सरदार,देशमुख जे गेली अनेक वर्षे दुसऱ्यांची चाकरी करत होतेत्यांना या पवित्र कार्यासाठी प्रवृत्त केलेत्यासाठी त्यांना पत्रे पाठवलीप्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि एक मोठी फौज शिवबांच्या पाठी उभी केलीस्वराज्य रक्षण आणि धर्म स्थापनेच्या कामी मदत करायला जी मंडळी शिवरायांच्या मागे उभी राहिलीत्यात कानद खोऱ्यातले झुंजार मरळ,शिवगंगाचे कोंडे,मावळातले हैबती शिळमकर,रोहड्याचे जेधे,अशी विविध खोऱ्यातली मंडळी जमा झाली ती बाजी पासलकरांचा मुळेचतसेच पायगुडे,तानाजी मालुसरे,येसाजी कंक,बाजी जेधे,चिमणाजी देशपांडे अशी नव्या रक्ताची,नव्या दमाची तरुण मंडळी या कार्यासाठी पुढे आलीत्यालाही हस्ते परहस्ते जबाबदार ठरले ते वयोवृद्ध पासलकरचस्वराज्याची शपथ घेतल्यावर शिवरायांना जो पहिला किल्ला जो रक्ताचा एक थेंबही ना सांडता मिळाला तो बाजी पासलंकारांमुळेचबाजी पासलकरांना नंग्या समशेरीनिशी गडाच्या दारी उभे राहिलेले पाहून किल्लेदाराने आपल्या हातातले शास्त्र खाली ठेवलेआणि गडाचा ताबा दिलागड ताब्यात आला आणि स्वराज्याच पहिल तोरण बांधलं गेलंआणि शिवराजांची सत्ता हळूहळू वाढू लागलीअनेक देशमुख,सरदार,वतनदार हे आदिलशहाच्या विरोधात जाऊन शिवरायांना सामील होऊ लागले.

या बंडाचा वेळीच बिमोड केला नाही तर हा शिवाजी डोईजड होईल अशा आशयाच्या वार्ता बाद्शहा पर्यंत पोहोचवल्याप्रथम बादशहाने या गोष्टीची दखल घेतली नाहीपण जेव्हा शिवाजींच्या विरुद्ध असणाऱ्या,बाजी पासलकरांना पाण्यात पाहणाऱ्या काही विघ्नसंतोषी लोकांनी बादशहाचे कांन भरलेबादशहाने शिवाजींचा बिमोड करण्यासाठी प्रचंड मोठ्या फौजेसह या कामी फत्तेखान याला दक्षिणेत रवाणा केलेपुरंदर किल्ल्यावर त्यावेळी राजांची स्वारी होतीराजे बाजी पासलकर,कावजी मल्हार खासनीस,बाजी जेधे,जगताप ह्यांच्या सोबत काही सल्ला मसलत करत असताना एका गुप्तहेराने फत्तेखान एका मोठ्या फौजेसह पुरंदर किल्ल्याच्या दिशेने येत आहे अशी वार्ता दिलीती वार्ता ऐकली आणि बाजी पासलकर ह्याही समशेरीवर हाताची मूठ घट्ट झाली.नाहीतरी स्वातंत्र्याच्या या पहिल्या रणसंग्रामासाठी कुणीतरी अनुभवी व्यक्तीची गरज होतीमहाराजांनी पंत आणि मासाहेब यांचेकडून पासलकरांनी आजवर गाजवलेला पराक्रम ऐकला होताबाजींच्या अनुभवी नेतृत्वगुणाचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी शिवबांनी त्या पाहिल्या लढाईच सेनापतिपद हे बाजी पासलकर ह्यांनाच बहाल करून त्यांच्या अंगावर सेनापतीपदाची मोठी जबाबदारी देऊन त्यांचा गौरव केलातिकडे फत्तेखानचा अंगरक्षक मुसेखान याने आपण पुरंदर गडावरच हल्ला करावा,असा सल्ला दिलात्या सल्ल्यानुसार फत्तेखान आपली फौजघेऊन पुरंदरच्या पायथ्याशी आलाअनुभवी बाजी पासलकर यांनी गडाची सुरक्षा पक्की केली

कारण त्यांना खात्री होती कि फत्तेखान इकडेच धडक मोर्चा मारणारबाजींनी गडाच्याबुरुजावर दगड गोटे गोळा केलेअंतरा अंतरावर तरबेज तिरंदाज सज्ज ठेवलेसंपूर्ण गडाभोवती समशेरबहाद्दरांचा पहारा उभा केला आणि कधी एकदा फत्तेखानाची सेना आपल्या नजरेच्या टप्प्यात येतेय याची वाट बाजी पाहू लागलेहिरवी निशाणे दिसली,घोषणांचे आवाज ऐकू येऊ लागलेफत्तेहखानाचे सैन्य गडाच्या रोखाने वर येऊ लागलेत्याचवेळी ठरल्याप्रमाणे त्यांच्यावर बाणांचा आणि दगडगोट्यांचा मारा चालू केलाअसं होत असतानाही मुसेखान आणि त्याचे कडवे सैन्य वर वर येऊ लागलेतसे बाजी पासलकर सज्ज झालेत्यांनी आपल्यासैन्याच्या चार तुकड्या करून स्वतः राजे,बाजी जेधे,कावजी मल्हार आणि एका तुकडीचे नेतृत्व आपल्याकडे घेऊन सारेजण एकाच वेळी शत्रूवर तुटून पडलेयुद्धाच्या ला रणधुमाळीत अनेकजण कामी आलेकुणी प्राणाला मुकले तर कुणी जबर जखमी झालेमुसेखान आणि बाजी जेधे समोरासमोर आलेखान बाजीवर वार करणार तोच गडावरून एक बाण मुसेखानाच्या गर्दणीत घुसलात्याच क्षणी मुसेखान पडला.मुसेखान पडताच त्याची सेनापळू लागलीएकीकडे पासलकरांनी कावजी मल्हारला सुभानमंगल किल्ला जिंकण्यासाठी शिरवलकडे पाठवलेमुसेखानाच्या,फत्तेखानाच्या सैन्याला बाजी पासलकरांनी मागे मागे रेटत नेले.आणि तेथेच घाट झालाफत्तेखानला नव्या दमाची कुमक येऊन मिळालीसर्वांनी एकट्या बाजी पासलकरांना घेरलेतरीही बाजींच्या हातातली समशेर सटासट शत्रूची गर्दन आसमानातं उडवत होतीतोच नव्या दमाच्या फौजेने बाजींवर प्राणघातक हल्ला केलाआणि त्यात बाजी पासलकर धारातीर्थी पडलेसाठी उलटलेल अनुभवानं पिकलेलं,स्वामीनिष्ठेनं प्राणांची बाजी लावणारं पहिल्या लाढीतलं सेनापतिपद परत एकदा मोकळ झालं




No comments:

Post a Comment