Showing posts with label पुरंदरचा वेढा. Show all posts
Showing posts with label पुरंदरचा वेढा. Show all posts

Saturday, 1 July 2017

पुरंदरचा वेढा व तह





पुरंदरचा वेढा तह

किल्ले पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशीवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही,हे दिलेरखानाला माहीत होते. आणि त्यामुळेच दिलेरखानाने पुरंधरला वेढा दिला होता. दिलेरखानाची फौज फार मोठी होती,पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. आणि त्याच्याजवळचे सैनींक मोठे शूर गडी होते. हे सगळे शूर सैनिक घेऊन मुरारबाजी लढाईसाठी उभा राहिला. दिलेरखानाच्या तोफा कडाडू लागल्या. आणि तोफेचे लालभडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले,परंतु मुरारबाजी त्याचे सैन्य बाजूला हटले नाहीत,उलट ते अधिक जोराने झुंजू लागले. मुघलांनी तोफांचा भडीमार केला. आणि  माचीचा बुरुज ढासळला. तेवढ्यात मुघल माचीवर घुसले. आणि दिलेरखानाने माची जिंकली. नंतर मराठ्यांनी वरच्या माचीचा आधार घेतला. आणि ते लढतच राहिले. दिलेरखान आपल्या छावणीतून हि लढाई बघत होता. मुरारबाजी रागाने लाल झाला होता. मुरारबाजीने पाचशे मावळे निवडले

  

आणि त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करण्याचा बेत केला. आणि बालेकिल्याचा दरवाजा उघडला. आणि 'हर हर महादेव'अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले. थोडा वेळ भयंकर लढाई झाली. मुघलांचे सैन्य अफाट होते,तरीही मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला. आणि शेवटी मुघलांनी माघार घेतली. आणि ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव मुठीत घेऊन पळत सुटले. मुरारबाजीने ते पाहिले,आणि त्यांनी त्यांचा पाठलाग केला. मुराजबाजींचे सैन्य छावणीत घुसले. आणि एकच गोंधळ मजला. धावाधाव,आरडाओरडा,किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला. दिलेरखान घाई घाईने हत्तीवर अंबारीत बसला. आणि त्याने समोर पाहिले,तोच त्याला मुरारबाजी दिसलामुरारबाजींची तलवार कोणाच्या छाताडात,कोणाच्या मस्तकात,तर कोणाच्या कंठात घुसत होती. मुरारबाजी कोणालाही आवरत नव्हता. त्याचे शौर्य पाहून दिलेरखान थक्क झाला. आणि दिलेरखानाला पाहून मुरारबाजी चवताळला. 'कापा,तोडा,मुडदे पाडा,असे ओरडून मुरारबाजी शत्रूवर तुटून पडला. त्याची समशेर जोराने फिरू लागली. जो आड आला,तो ठार झाला. त्यामुळे या एकट्या वीराला मुघलांनी चारी बाजूनी घेरले. इतक्यात दिलेरखान अंबारीतून ओरडला,''थांबा'' मुगल थांबून मागे सरले. खान मुरारबाजींना म्हणाला,''मुरारबाजी,तुझ्यासारखा समशेरबहाद्दर मी आजपर्यंत पाहिला नाही.

तू आमच्यात ये बादशहा तुला सरदार करतील. आणि बक्षीस देतील,तुला जहागीर देतील''त्याचे हे शब्द ऐकून मुरारबाजीला राग आला रागाने त्याचे डोळे लाल झाले. आणि तो चवताळून म्हणाला,''अरे, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे,आम्हाला काय कमी आहे. तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला'' आणि मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला. हे पाहून दिलेरखानाने अंबारीतून एक बाण सोडला. तो बाण मुरारबाजीच्या कंठात घुसला. मुरारबाजी जमिनीवर कोसळला. मराठ्यांनी त्याचा देह उचलला आणि त्यांनी बालेकिल्ला गाठलाकिल्लेदार मुरारबाजी पडला म्हणून मराठ्यांना खूप दुःख झाले,पण एक मुरारबाजी पडला म्हणून काय झाले,आम्ही तसेच शूर आहोत. हिम्मत धरून लढतो,मावळे असे म्हणून पुन्हा डगमगता लढू लागले. हि बातमी महाराजांना किल्ल्यावर त्यांना फार दुःख झाले. आणि महाराजांनी विचार केला,कि एक एक किल्ला वर्ष वर्ष लढवता येईल,पण लाख मोलाची माणसे मारतील. शिवरायांना ते नको होते. शक्ती चालेना,युक्ती उपयोगी पडेना,त्या वेळी माघार घेणेच योग्य;म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले. स्वता महाराज जयसिँगाकडे गेले. आणि त्यांनी त्याच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले

ते म्हणाले,''मिर्झाराजे,आपण राजपूत आहात. आमचे दुःख आपण जाणता. बादशहांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उध्वस्त झाला आहे. सर्व लोकांचे हाल होत आहे. लोक सुखी व्हावे,म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे. आपणही हे काम हाती घ्यावे मी आणि माझे मावळे सतत आपल्या पाठीशी उभे राहू''. पण जयसिग मोठा धूर्त होता. त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले. आणि महाराजांनी तह केला. या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले आणि त्याखालचा चार लक्ष होनांचा मुलुख मुघलांना देण्याचे कबुल केले. हा तह १६६५ साली झाला. पुरंदरचा तह झाला. आनी याच वेळी शिवरायांनी आग्ऱ्यास जाऊन बादशहाची भेट घ्यावी,जयसिंगाने महाराजांना असे सांगून त्यांना सुरक्षततेची हंमी दिली. महाराजांनी जयसिंगाच्या सुचसनेवर  विचार केला. पण बादशहा मोठा कपटी आहे,बादशहाने स्वतःच्या भावांशीसुद्धा दगाबाजी केली,हे राजे ओळखून होते. तरीही या मोठ्या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे,असे शिवरायांनी ठरवले. आम्ही बादशहाची भेट घेण्यासाठी आग्ऱ्याला जायला तयार आहोत,असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले.