Monday, 5 June 2017

राजमाता जिजाऊ आईसाहेब (Jijamata)

 'जिजाऊ' ,ह्या नावांमध्येच प्रेम अगदी काठोकाठ भरलेलं आहे. शिवबाची आई,महाराष्ट्राची आई,महाराष्ट्राची कुलदेवी,महाराष्ट्राची स्फूर्तीदेवी,महाराष्ट्राची शक्ती म्हणजेच साक्षात आई जगदंबा;आई भवानी. स्वराज्याचे स्वप्न आपल्या उराशी बाळगणारी हि स्वातंत्र्यदेवता; प्रत्यक्ष आई जगदंबाच पृथ्वीतलावर महहराष्ट्रभूमीमध्ये जन्माला आली. इ.स.१२ जाने. १५९८ महाराष्ट्राच्या भूमीवर सह्याद्रीच्या या राकट,दणकट प्रादेशामध्ये अनेक अनमोल हिरे जन्माला आले आहेत. त्यांचे मोल करणारी तागडी अद्याप जन्माला यायची आहे.


जिजाबाई शहाजी भोसले  

जिजाऊ हि सिंधखेडच्या लखुजीराव जाधवची लेक. लखुजीराव म्हणजे बडे प्रस्थ. नजामशाहीतील मोठे सरदार. सत्तावीस महालांची जहागिरी. घरात ऐश्वर्य ओसंडून वाहत होते. जिजाऊ मोठी झाली. जिजाऊ लहानपणापासूनच सर्वांची आवडती,मनमिळाऊ,प्रेमळ आणि जबाबदार होती. जिजाऊच्या चेहेऱ्यावर मूर्तिमंत शालीनता होती. नेत्र सूर्यासारखे तेजस्वी होते. अशी सर्वगुण-संपन्न जिजाऊ शहाजीराजांची धर्मपत्नी झाली. भोसले घराण्याची सून झाली. लाखुजीरावांनी मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिले होते. शहाजीराजे हे निजामाच्या पदरी सरदार होते,ते लाहान वयातच मोठे पराक्रमी व शूर होते. जिजाऊ शहाजीराजांसोबत दौलताबादला देवगिरी येथे आली. 

स्वराज्याची प्रेरणा 

जिजाऊंची निरीक्षणशक्ती अफाट होती. महाराष्ट्रातील गुलामगिरी तिच्या तीक्ष्ण नजरेतून सुटू शकली नाही. घरी संपत्ती अफाट होती. जमीनजुमला जहागिरी;नुसते बसून खाल्ले असते तरी संपली नसती. परंतु स्वातंत्र्य देवतेला नैवेद्य लागतो स्वातंत्र्याचा आणि उन्मत्त बोकडांचे बळी घेतल्यावाचून स्वातंत्र्य मिळणार नाही. हे जिजाऊच्या ध्यानात आले होते. सुलतानांनी आपल्या भूमीचे काढलेले धिंडवडे तिला पहावत नव्हते. देशाच्या,महराष्ट्राच्या जनतेला वाली नव्हता. सर्वत्र क्रूरता,हिंसाचार,बलात्कार,जुलूम,जबरदस्ती यांनी थैमान घातलेले,तोंड उघडायचीही सोय नव्हती. जिजाऊंचे मन व्याकुळ होत होते. एके दिवशी निजामाचा दरबार संपला आणि एकाएकी मैदानातील हत्ती उधळला. त्या हत्तीवरून भोसले घराने व जाधव घराणे यांची हमरी-तुमरी झाली. जिजाऊंचा भाऊ दत्ताजीराव व दीर संभाजीराव एकमेकांविरुद्ध लढून मेले. भोसले-जाधव घराणे एकमेकांचे कट्टर वैरी झाले. जिजाऊनी कोनासाठी रडायचे,ती रडत होती महाराष्ट्रासाठी. जिजाऊ खूप दुखी झाली. सुलतान मौज करत होते. आणि मरत मात्र होते मराठे. 
शहाजीराजांनाही सुल्तानशाहहीचा वीट आला होता. त्यांनी बाद्शहाविरुद्ध बंड पुकारले. दिवस धावपळीचे होते. समय बिकट होता. त्यांनी जिजाऊला सह्याद्रीच्या बळकट खांद्यावर,शवनेरी गडावर ठेवले व ते युद्धाला निघून गेले. लवकरच एक गोड बातमी आली. जिजाऊंना दिवस गेले होते. जिजाउ दुःख विसरून आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण नियतीला हे पाहावले नाही. जिजाऊंची जाऊ म्हणजेच शहाजीराजांचे चुलत बंधू खेळोजीराजांच्या पत्नीला गोदावरी काठावरून मुघल सरदार महाबतखानाने पळवून नेले. हि वार्ता विरते न विरते तोच जिजाऊंवर दुःखाचा डोंगर कोसळला. जिजाऊंचे वडील लखुजराव व त्यांचे तीन पुत्र निजामशहाला मुजरा करण्याकरिता देवगिरीच्या किल्ल्यात गेले. असता निजामशहाने भर दरबारात त्या सर्वांची निर्घृण हत्या केली. काय म्हणावं या प्रकाराला,जिजाऊंचे माहेर आधी तुटले होते, आतातर सारेच संपले, जिजाऊंच्या हृदयामध्ये काय वेदना होत असतील ते ब्रह्मदेवच जाणो. काही काळ निघून गेला, जिजाऊंचे अंतर्मन सुडाने पेटून उठले होते. ह्या नीच सुलतानांचा खात्मा करण्याची तिची महत्वाकांक्षा जागृत झाली. तिने आई भवानीशी गाऱ्हाणे मांडले.'माते,या दुष्ट कालयवनांच्या तावडीतून माझ्या राष्ट्राला सोडवू शकेल असा तेजस्वी पुत्र माझ्या पदरात घाल. हे एकच मागणे आहे. तेवढे तू मला दे. आई मला मदत कर ;मदत कर. 

शिवरायांचा जन्म 

''आई जगदंबेने तिची प्रार्थना ऐकली. व गर्भातील बालकानेही ऐकली. लवकरच जिजाऊंना डोहाळे लागले. चिंचा खायचे नव्हे तर तलवार फिरवण्याचे. आनि दि. १९ फेब्रुवारी १६३० शुक्रवार रोजी भारतवर्षाचा महान भाग्यविधाता,सह्याद्रीचा सिंह जन्माला आला. शिवबाचा जन्म झाला. सगळीकडे आनंदीआनंद झाला.   


जिजाबाई हि सामान्य स्त्री नव्हतीती लखुजीराव जाधवांच्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होतीराजकारणाचे  युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होतेजाधव  भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा यांच्या ठिकाणी एकत्र आली होतीजिजाबाई मोठ्या स्वाभिमानी  स्वातंत्र्यप्रिय होत्यामराठा सरदाराने कितीही पराक्रम केला,तरी सुलतानांच्या दरबारात त्याचे चीज होत नाही,याचा त्यांना वाईट  अनुभव आला होतानिजामशहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होतीजिजाबाईंनी आता निश्चय केला होता,कि त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाहीतो स्वतः आपल्या लोकांचे राज्य स्वराज्य स्थापन करीलया विचाराने त्या शिवबांना घडवत होत्यामावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतमावळे इनामी,कष्टाळू  चपळ होतेकाटकपणात त्यांचा हात कोणीही धरत नसेपण ते सुलतानी राजवटीने गांजले होतेसुलतानांच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटली जातरयत परांगता होईतिला कोणी वाली नसेअशा दुखीकष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे,असे शिवरायांना वाटेघरी आल्यावर शिवराय जिजाबाईपाशी हितगुज करत

शिवरायांवरचे संस्कार 

जिजाबाई म्हणत,''शिवबा,भोसल्यांचा पूर्वज श्री रामचंद्रश्री रामचंद्राने दुष्ट रावणाला मारलेआणि प्रजेला सुखी केलेजाधवांच्या पूर्वज श्रीकृष्णत्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केलेश्रीराम आणि श्री कृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहेअरेतूसुद्धा दुष्टांचा संहार करू शकशीलतूसुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील.''आईच्या या उपदेशाने शिवबांना हुरूप येईराम,कृष्ण,भीम,अर्जुन या वीरांच्या गोष्टी आठवतहे वीरपुत्र शिवरायांना सतत ध्यानी,मणी,स्वप्नी दिसतहे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले,तसे आपण लढावेत्यांनी दुष्टांचा नाश केला,तसा आपण करावात्यांनी प्रजेला सुखी केले,तसे आपण करावेआपण न्यायी व्हावे,धाडसी व्हावे,पराक्रमी व्हावे,असे शिवरायांना वाटू लागले. याच संस्करातून भारतवर्षाला एक महान राजा मिळाला.  
छत्रपती शिवाजी  राजांच्या राजयभिषेकानंतर बारा दिवसांनी जिजाऊ साहेबांची प्राणज्योत रायगडाच्या पायथ्याला पाचाड येथे मावळली.
जय जिजाऊ ! जय शिवराय ! 

No comments:

Post a Comment