प्राचीन वाङ्मयात दुर्ग प्रभेदात
जलदुर्गास तिसऱ्या क्रमांकावर ठेवले
आहे. कौटिल्यानुसार राज्याच्या
सीमेच्या रक्षणासाठी नैसर्गिक साधनांच्या
मदतीने दुर्ग व्यवस्था केलीच
पाहिजे. गरजेनुसार नदीकाठी किंवा
पाणी भरलेल्या जागी
जलदुर्गाची स्थापना केलीच पाहिजे.
भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा
आहे. शुपारक मुंबईचे
पारासीपारा,भरुकच्छ गुजरातचे भडोच,कोचीन कोच्चीनाड किव्वा
कालिकत केरळ,नेल्लुर
आंध्रप्रदेश,धौली ओरिसा,
ताम्रलिप्ती पश्चिम बंगाल आणि
वेंगीपुरम तामिळनाडू इ. प्राचीन
प्रसिद्ध बंदरे होती. या
बंदरातून दूरवरच्या देशाशी संबंध
होते. कालिंग,चॉकोच्चीनाड
या राज्याची व्यवस्था
परदेशाच्या व्यापारी व्यवस्थेमुळेच समृद्ध
होती. सागर किनाऱ्यावर
बनलेल्या किल्ल्यांची लांब साखळी
आहे. कोचीन,गोव्याचे
किल्ले इ. सागरी
किल्ल्यांपेक्षा प्राचीन आहेत. दुर्गरचनेनुसार
पाहता कोचीन किंवा
जंजिरा किंवा अलिबागचे किल्ले
प्रेक्षणीय आहेत. सामान्यतः सागरी
किल्ल्यास इतर किल्ल्यांपेक्षा
अधिक खर्च येतो. मध्ययुगाचे
तात्कालीन राज्यकर्ते आपापसातील संघर्षात
इतके गुंतले होते
कि,बंदर व
सागरातून व्यापारी संबंधांकडे त्यांचे
लक्ष नव्हते. आणि
याचा परिणाम देशाला
भोगावा लागला. एवढेच नव्हे
तर पश्चिमेस गुजरातपासून
कोचीनपर्यंत व पूर्वेला
पॉण्डेचारीपासून हुगळीपर्यंत चार शतकांपर्यंत पोर्तुगीज,डच,अबिसीनियाचे
सिद्दी आणि इंग्रजांनी
आपला धाक आणि
प्रतिष्ठा स्थापन केली. इंग्रजांनी
मुंबई फोर्ट सेंट
जॉर्ज,मद्रास आणि
कोर्ट विल्यम कलकत्त्यापासून संपूर्ण
देशभर आपला व्यापार
पसरवला. एवढेच नव्हे युरोपातील
पोर्तुगीज राजाने बोआ बहिया
उत्तम खाडी नंतर
ती सप्त द्वीपाची
मुंबई झाली.
आपली
राजकुमारी कॅथरीन ब्रगाझासोबत हुंडा
म्हणून ब्रिटनचा राजा चाल्स
व्दितीयला दिली.
१६६१ मध्ये पोर्तुगीज
लोकांनी संपूर्ण मुंबई बेट
१५ पौंडात ईस्ट
इंडिया कंपनीस विकून टाकले.
या क्षेत्रास इंग्रजांच्या
ताब्यातून सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना
आकाश पाताळ एक
करावे लागले. शिवरायांनी
पश्चिम घाटाच्या समुद्र किनाऱ्याच्या
नियंत्रणासाठी विजयदुर्ग,सुवर्णदुर्ग,आणि
सिंधुऊदुर्गाची नव्याने निर्मिती केली.
आणि जंजिऱ्यासमोर कुलाब्याचे
किल्ले बनवले. सोनगड किव्वा
सुवर्णदुर्गाच्या उंच दगडी,तटबंदी समुद्रातून वर
येणारी मोठी भव्य
दिसते. मध्ययुगात जुनागड,सुरत,मुंबई,घेरिया,सिंधू,जंजिरा
आणि गोव्यात अनेक
सागरदुर्ग बनले. गुजरातच्या सुलतानाने
पोर्तुगीजांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी
जुनागढमध्ये इजिप्तच्या तोफा मागवल्या
होत्या. या तोफा
जुनागढच्या उपरकोट किल्ल्यात आजही
आहेत. सुरतेवर पोर्तुगीजांनी
अनेकदा आक्रमण करून ते
शहर लुटले. सुरतच्या
बचावासाठी गुजरातचा सुलतान बहादूरशहाने
१५४६ मध्ये १८
मीटर उंच तटबंदी
व मजबूत बुरुजांची
बांधणी केली. या बांधकामाची
जबाबदारी एका तुर्की
सरदाराला सोपवीली होती.सागरदुर्गाच्या
बांधकामात शिवाजी महाराजांची कामगिरी
अविस्मरणीय आहे. त्यांनी
तीन मुख्य सागरदूर्ग
बनवून नौसेना स्थापन
केली. आणि इंग्रज,पोर्तुगाल,आणि सिद्दीशी
लढा दिला. सागर
किल्ल्यात मुख्यतः खांदेरी, जंजिरा,सिंधुदुर्ग,विजयदुर्ग,कल्याण,सुवर्णदुर्ग,कनकदुर्ग,अलिबाग,गोव्याचे किल्ले,घोडबंदर,आणि रत्नागिरी
उल्लेखनीय आहेत.
अजिंक्य जंजिरा
मुंबईच्या दक्षिणेस १६५ कि.
मी. सागर किनाऱ्यावर
कोकणात अयाबिसिनियन लोकनी राजपुरी
खाडीत सव्वा कि.
मी. आत जंजिराचा
प्रबळ दुर्ग १५११
मध्ये स्थापन केला.
अयाबिसिनियन लोक आपले
शौर्य,निष्ठा आणि
कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. विजापूर,अहमदनगरसह अनेक राज्यात
उच्च पदावर त्यांची
नेमणूक होती. मोगल बादशहा
औरंगजेब सुरत ते
रत्नागिरी समुद्र किनाऱ्याचे समुद्री
चाच्यांनपासून रक्षणासाठी या लोकांना
दरवर्षी तीन लाख
रुपये देत होता.
सिद्दीने या
किल्ल्यास मेहेरबा मेहरुसा अशी
सुंदर नावे या
किल्ल्यास दिली. अंडाकार वर्तुळाच्या
ग्र्यानाइट दगडाचा जंजिरा अद्भुत
सागरी दुर्ग आहे.
स्थापत्याशिल्पाच्या दृष्टीने याची निर्मिती
अवर्णनीय आहे. गोल
बुरुजाच्या या तटबंदिशी
सागरी लाटा नेहमी
धडका देत असतात.
किल्ल्याच्या भरती ओहोटीची
पातळी दोन मीटर
उंच आहे. तटबंदीवर
एकूण १९ तोफा
आहेत. व तोफांच्या
माऱ्यासाठी तटाला छिद्रे आहेत.
किल्ला इतका मोठा
आहे कि,त्यात
एक छोटे शहर
सामावू शकते. छत्रपती शिवाजी
महाराजांनी अनेक वेळा
हा किल्ला जिंकण्याचे
प्रयत्न केले. पण ते
यशस्वी झाले नाहीत.
सिद्दी हा किल्ला
रायगडापासून अवघ्या ३० कि.
मी. अंतरावर आहे.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगड जिंकण्याच्या
मोगलांच्या प्रयत्नात सिद्दीची भूमिका
महत्वाची होती. पोर्तुगीज व
इंग्रजांनाही हा किल्ला
घेता आला नाही.
हा किल्ला म्हणजे
सागरी वर्चस्वाची किल्ली
आहे. सिंधुदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यात
सिंधुदुर्ग सर्वात विलक्षण आहे. हा किल्ला मुंबईहून
१०४ कि. मी.
अंतरावर मुंबई गोवा महामार्गावर
रत्नागिरीच्या दक्षिण पट्टीवर मालवण
समुद्र किनाऱ्यावर आहे. हि
त्याची दुसरी राजधानी होती.
येथे जहाजाने जाता
येते. मालवणला उतरल्यानंतर
किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी होड्या मिळतात.
याच्या नागमोडी जलमार्गात अनेक
जलमग्न दगड आहे.
आता नष्टप्राय असलेल्या
व सागरातून किल्ल्याचा
महादरवाजा दिल्ली दरवाजा दिसतो.
सामुद्रिक चाच्यांनपासून मराठी राज्याचे रक्षण
करण्यासाठी शिवाजी महाराजांनी १६६२-
१६६५ मध्ये हा
किल्ला उभारला. सहा हजार
लोकांनी रात्रंदिवस काम करून
हा किल्ला उभारला.
सागराचा तटबंद बांधण्यासाठी सुमारे
७२५७६ किलोग्राम लोखंड
लागले. किल्ल्याचे बांदकाम गोविंद
विश्वनाथ प्रभूच्या देखरेखीत झाले.
सिंधुदुर्गाच्या सन्निवॆश रामायणात वर्णन
केलेल्या श्रीलंकेच्या वर्णनाप्रमाणे आहे. किल्ल्यास
अजिंक्य बनवण्यासाठी आसपास अनेक
उपदुर्ग बनवण्यात आले. आणि
हे मराठी नौदलाचे
केंद्र होते.
दुर्गाचा परीघ १९
हेकटर क्षेत्रात तीन
कि. मी. व्यासात
आहे. तटबंदीची उंची
१०६ मीटर आणि
रुंदी ४५ मीटर
अर्धवृत्ताकार आकारात एकूण ५२
बुरुज आहेत. पूर्वेकडे
किल्ल्याचा महादरवाजा आहे. या
दारापर्यंत जाण्यासाठी अनेक वळणे
ओलांडावी लागतात. प्रवेशद्वारावर
मारुतीची प्रतिमा आहे. आत
गेल्यावर एका शिलाखंडावर
छत्रपतींच्या हात व
पायाची चिन्हे उत्कीर्ण आहे.
किल्ल्यात अनेक मंदिरे
आहेत. त्यात शिवराजेश्वर
मंदिर प्रमुख आहे.
राजमहालाजवळ शक्करबाव
विहीर दुधबाग आणि
दहिबाग आहे. किल्ल्यात
१५ ते २०
घरांची वस्ती आहे. राजमहाल
उध्वस्त झाला आहे.
नैऋत्येस दीपस्तंभ आहे. किल्ल्यात छत्रपतींच्या
स्मृतीची अनेक प्रतीके
आहेत. त्यांची तलवारही
येथे ठेवली आहे.
येथे सागराचे दृश्य
रोमांचकारी आहे. चारही
बाजूला पाणीच पाणी दिसते.
किल्ल्याच्या तटावरून सागराचे दर्शन
आल्हादकारी आहे. सिंधुदुर्गाच्या
रक्षणासाठी कदंबगड,राजकोट आणि
सरपेकोट,भगवंतगड आणि भरतगड
सहायक दुर्ग उभारण्यात
आले. आणि या
दुर्गांमुळे संपूर्ण क्षेत्र सुरक्षित
झाले. सिंधुदुर्गास पूर्णपणे
अजिंक्य करण्यासाठी भूषणगड,सदाशिवगड,मच्छिद्रगड व संतोषगड
इत्यादी किल्ल्ले संभाव्य हल्ले
रोखण्यासाठी उभारण्यात आले. आंगरे,पेशवे व कोल्हापूरकर
भोसल्यांचे यावर राज्य
होते.
घोडबंदर वसईचे किल्ले
मुंबईच्या चर्चगेटपासून ५२ कि.
मी. उत्तरेस घोडबंदरचे
जुने किल्ल्ले आहेत.
घोडबंदरवर पोर्तुगीजांचे बरेच दिवस
राज्य होते. हा
किल्ला काबीज करण्याची छत्रपती
शिवाजी महाराजांची इच्छा होती.
पण ती पूर्ण
होऊ शकली नाही.
पण त्यांच्या मृत्यूनंतर
हा किल्ला मराठ्यांच्या
हाती आला. घोडबंदरमध्ये
नवाबाच्या वाडा आता
पर्यटन विभागाचे केंद्र बनला
आहे. घोडबंदर आणि
वसईच्या दरम्यान वसईची खाडी
आहे. वसईचा किल्ला
वसईस्थानकापासून १० कि.
मी. दूर समुद्रकिनाऱ्याच्या
वर आहे. नारळीच्या
झाडीमुळे किल्ल्याची तटबंदी दुरून
दिसत नाही. वसई गाव
ओलांडल्यानंतर किल्ल्याची पूर्वेची पडती
तटबंदी दिसते. पुरातत्व विभागाच्या
काळ्या पट्टीवरून आपल्यास वसई
किल्ल्याच्या क्षेत्रात असल्याची जाणीव
होते. वसई किल्ल्याचा
पश्चिम तट समुद्रास
लागला आहे. तो
२५ मीटर उंच
आहे. आता समुद्राकडे
एक छोटे एक
मोठे फाटक लागले
आहे.
फाटकातून आत
गेल्यावर पोर्तुगीजांनी बांधलेले चर्च लागते.
ते हि आता
उजाड आहे. जवळच
वर जाण्यासाठी एक
गोल जिना आहे.
त्याची इतकी
वळणे आहेत कि
वर जाईपर्यंत चक्कर
येते. वसई किल्ल्याचे अस्तित्व प्राचीन
आहे. येथे मौर्यकालीन
किल्ले होते. त्याच्या अवशेषांवर
गुजरातच्या बहादूरशहाने पंधराव्या शतकात
किल्ला बांधला. १५५० मध्ये
पोर्तुगीजांनी किल्ला काबीज केला
व त्याची सत्ता
२०० वर्षे कायम
राहिली. पोर्तुगीजांच्या राजवटीत किल्ल्यास नवे
रूप मिळाले. चर्चशीवाय
अनेक युरोपियन शैलीच्या
इमारती उभ्या झाल्या. शिवाजी
महाराजांनी १६३७ मध्ये
हा किल्ला घेण्याचा
प्रयत्न केला. १७३७ मध्ये
चिमाजी आप्पाच्या नेतृत्वात मराठ्यांच्या
सैन्याने किल्ल्यावर आक्रमण करून
पोर्तुगीजांना शरण येण्यास
भाग पाडले. १८०२
मध्ये मराठा व
इंग्रजातील कराराने हा किल्ला
इंगजांच्या ताब्यात आला. किल्ल्यात
फ्ल्याग पोस्ट,बंदर दरवाजा,कप्तानचे घर उल्लेखनीय
इमारती आहेत. येथे पोर्तुगीजांच्या
उत्तर प्रांताची राजधानी
होती.
अलिबागचा किल्ल्ला
अलिबाग कुलाबा जिल्ह्यात आहे.
जवळच खांदेरी व
उंदेरी असे दोन
सहायक किल्ले आहेत.
याला कुलाब्याचा किल्ला
किंवा हिराकोट असेही
लोक म्हणतात. छत्रपती
शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १३
सागरी किल्ल्यात कुलाबा
शेवटचा किल्ला होता. तो
त्यांच्या निधनाच्या वर्षी पूर्ण
झाला. किल्ला एका
शिळेवर आहे. ती
समुद्रात १६० मीटर
आत आहे. किल्ला
२८ चौ. मीटर
पसरला आहे. याच्या
तटबंदीवर १७ बुरुज
आहेत. छत्रपतींनी या
किल्ल्यापासून आपल्या नौदलाचा श्रीगणेशा
केला होता. जंजिरा
न जिकता आल्याने
छत्रपतींनी मुंबईजवळच्या खांदेरी बेटास काबीज
करून इंग्रज व
ठाण्याच्या पोर्तुगीजांना आव्हान दिले. त्यांनी
या बेटावर १६६५
पासूनच किल्ला बांधणीस सुरुवात
केली. इंग्रजांनी १६७९
मध्ये सिद्दीच्या मदतीने
खांदेरीच्या बेटास वेढले. भायंकर
लढाई होऊन इंग्रज
हलके पडले व
त्यांना छत्रपतींशी समझोता करावा
लागला. ८ जानेवारी
१६८० मध्ये झालेल्या
करारात खांदेरीवर मराठ्यांच्या मालकीला
मान्यता मिळाली. मुंबई इंग्रजांकडे
राहिली पण तिच्या
समुद्राचे स्वामित्व मराठ्यांकडे आले.
इंग्रजांनी शिवाजी महाराजांना छत्रपती
म्हणून मान्यता दिली. सिद्दी
व मोगलांनी या
करारास विरोध केला नाही.
या प्रकारे मराठा
नौसेना एक सागरी
सत्ता म्हणून उदयास
आली. अलिबाग मुंबईपासून
१११२ कि. मी.
अंतरावर आहे. बसशिवाय
अलिबागपर्यंत स्टीमर सेवाही आहे.
त्यामुळे कुलाब्याचे सौरक्षण होते.
पदमदुर्ग उर्फ कामसागड
जंजिऱ्याचा
मुकाबला करण्यासाठी शिवाजी महाराजांनी
मुरुडच्या खाडीत हा किल्ला
बांधणे सुरु केले
ते संभाजी राजांनी तडीस
नेले. एका खडकाळ
बेटावर हा किल्ला
असून दक्षिण बाजूला
त्याचा उंच परकोट
आणि महाद्वार आहे.
संभाजी महाराजांनी एक बालेकिल्ला
बांधायचा पण बेत
केला होता. पण
तो सिद्दीस गेला
नाही. हा किल्ल्ला
खुल्या समुद्रात आहे. आणि
तेथे मराठ्यांचे बांधकामाचे
साहित्य कसे आले
याचे नवल आहे. इतक्या
वर्षांपासून सागर या
किल्ल्याच्या परकोटास धडका देत
असूनहि हा किल्ला
अजून मजबूत आहे.
जंजिऱ्याचा मुकाबला करण्याचा पदामदुर्गाचा
इरादा अंशतःच सफल
झाला. आंग्र्याच्या राजवटीत
पदमदुर्गाचे महत्व
एकदम घसरले. सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील भगवंतगड हा मालवणपासून
१२ कि. मी.
अंतरावर असून तो
१७०२ मध्ये बावडेकरांनी
बांधला. हा एक
छोटासा किल्ला असून बावडेकर
आणि फोंड सावंतांच्या
लढाईत त्याची मर्यादित
स्थानिक भूमिका होती. याच
किल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी मालवणपासून
१२ कि. मी.
अंतरावर फोंड सावंताने
१७०२ मध्ये बांधला.
तो मालवण खाडीच्या
दक्षिण बाजूला छोट्याश्या टेकडीवर
हा किल्ला आहे.
याचा परकोट ३५
मीटर उंच असून
त्याला १० बुरुज
होते. याच्या बालेकिल्ल्याची
स्वतंत्र किल्लेबांदी असून आतमध्ये
७० मीटर खोल
विहीर आहे. तो भगवंतगडापेक्षा मजबूत आणि चांगला
किल्ला असून आजही
त्याची स्थिती चांगली आहे.
बावडेकराचा मुकाबला करण्यासाठी बांधलेल्या
या किल्ल्याचे स्थानिक
महत्व आहे.
मालवनपासून
२२ कि. मी.
अंतरावर कुडाळ शहराजवळ विजापूरच्या
सुलतानाने सोळाव्या शतकात
बांधलेला कुढाळचा किल्ल्ला आहे.
त्याला चिखल व
दगडाची भिंत असून
अनेक बुरुज आहेत.
भिंतींच्या बाहेर खंदक आहेत.
त्याला तीन द्वार
आहेत किल्ला उध्वस्त
स्थितीत आहे. १६६३
आणि १६६४ मध्ये
येथे कुढाळच्या सावंतांच्या
शिवाजी महाराजांशी चकमकी झाल्या.
१६७० मध्ये शिवाजी
महाराजांनी हा किल्ला
जिंकला.
मालवणपासून
२० कि. मी.
अंतरावर नादोस खेड्याजवळ नादोसचा किल्ला
आहे. नंतर तो
नष्ट झाला. मालवणपासून
२२ कि. मी.
अंतरावर समुद्र किनाऱ्यावर तीवरीचा
किल्ला आहे. याचे
वर्णन उपलब्ध नसले
तरी सावंत आणि
बावडेकराच्या चकमकीत त्याचा उल्लेख
येतो. मालवणपासून एक
कि. मी. अंतरावर
शिवाजी महाराजांनी १६६२ मध्ये
पदमगड हा किल्ला
बांधला. हा किल्ल्ला
सिँधुदुर्ग व मालवणच्या
मध्यभागी एका बेटावर
हा छोटासा किल्ला
आहे. शिंधुदुर्गाच्या इतक्या
जवळचे बेट असुरक्षिपणे
ठेवणे योग्य नाही
म्हणून शिवाजी महाराजांनी हा
किल्ला बांधला. येथील पाणी
स्थळ आणि जलमग्न
खडकाचे आहे. मालवण
शहरात राजकोट म्हणून
किल्ला असून त्याची
दगडी भिंत आणि
बुरुज स्पष्ट दिसतात
बाकीचा किल्ला उध्वस्त आहे.
मालवणासून २० कि. मी.
अंतरावर हा अत्यंत
मजबूत किल्ला असून
अनेक ठिकाणी त्याचा
परकोट उंचीपेक्षा जास्त
रुंद आहे.
त्याला बुरुज आणि पश्चिमाभिमुख
महाद्वार आहे. आतमध्ये
शीखरापर्यंत पायऱ्या आहेत.
काही
किल्लेबंदी अजून दिसते.
या किल्ल्यामुळे मालवणला
ईशान्येकडून संरक्षण मिळाले आहे. मालवनपासून
तीन कि. मी.
अंतरावर समुद्राजवळ सर्जेकोट हे
होते. मालवणपासून १६
कि. मी. अंतरावर
सिद्गद असला तरी
त्याचे वर्णन किंवा इतिहास
उपलब्ध नाही. सावंतवाडीपासून २०
कि. मी. अंतरावर
वेंगुर्ल्याचा किल्ला आहे. तो
इ.स. १६००
मध्ये बांधलेला मजबूत
चौकोनी किल्ला आहे.
हा किल्ला १६६४
मध्ये शिवाजी महाराजांनी
काबीज केला. व
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर खेमसावंतने मिळवला.
१७०५ मध्ये तो
मोगलांकडे होता. १८५२ मध्ये
तो सावंतवाडीच्या राणीने
तो इंग्रजांना दिला.
मालवनपासून तो १६
कि. मी . अंतरावर
पेडणूर खेड्याजवळच्या टेकडीवर हा एक
मोठ्या आकाराचा किल्ला असून
आता त्याचे अवशेष
आढळतात. पण
किल्ल्याचे वर्णन व इतिहास
सांगता येत नाही. वेंगुर्ल्यापासून
१२. ५ कि.
मी. अंतरावर येशवंतगड
किल्ला आहे. शिवाजी
महाराजांनी १६६५ मध्ये
हा किल्ला जिंकला.
५५ मीटर परकोट
आणि भिंती असलेला
हा मजबूत किल्ला
आहे. जमिनीच्या बाजूने
दलदल असल्यामुळे त्याचे
सौरक्षण झाले आहे.
मुख्य द्वार ईशान्येला
असून अनेक बुरुज
आहेत. आतल्या बालेकिल्ल्यास
वेगळा परकोट बुरुज
आहे. किल्ला उध्वस्त
स्थितीत आहे. हा
किल्ला एक नौदलाचे
ठाणे असून समुद्र
व जमिनीवरील पोर्तुगीजांचे
अतिक्रमान रोखण्यासाठी हा किल्ला
उभारण्यात आला पण
पोर्तुगीजांनी पण पोर्तुगीजांनी
तो काबीज करण्याचा
प्रयत्न केला नाही.
No comments:
Post a Comment