Showing posts with label स्वराज्यस्थापनेची शपथ. Show all posts
Showing posts with label स्वराज्यस्थापनेची शपथ. Show all posts

Thursday, 29 June 2017

स्वराज्याची शपथ




रायरेश्वराच्या देवालयात शपथ 

पुण्याच्या नैऋत्येला असलेले  रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होतेतेथे १६४५ साली शिवराय  आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होतीत्या किर्र अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होतेश्री शंकरापाशी कोणते मागणे मागत होतेशिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते,पण यांच्या मनाची भरारी मोठी होतीत्यांनी एक मोठा  घाट घातला होतात्या देवालयात जमलेल्या सगळ्यांना ते कळकळीने म्हणाले




''गड्यानो,मी आज तुमहाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू काआमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेतत्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहेसर्व कसे छान चालले आहेपण गड्यानो,मला यात मुळीच आनंद वाटत नाहीसुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का. दुसऱ्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे काआपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेतत्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मारतातकुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतातआपल्या मुलखाची धूळधाण होतेआणि इतके सोसुनही आपल्या पदरी  कायतर गुलामगिरी  आपण हे किती दिवस सहन करायचेदुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचेसांगातुमीच सांगा  वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू दयायचे काशिवराय आवेशाने बोलत होतेत्यांचा चेहेरा रागाने लाल झाला होताबोलता बोलता ते थांबले

त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागलेरायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेलेनवीच दृष्टी त्यांना मिळालीत्यांच्यापैकी एक जण म्हणाला,"बोला बाळराजेबोलाआपला मनोदय सांगा आम्हालातुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत."हो राजे,तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू  आमचे प्राणही देऊ.मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढलेएकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले,''गड्यानो  आपला मार्ग ठरलाआपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे,सर्वांनी खपायचे,सर्वांनी प्राण अर्पन करायलाही तयार व्हायचेआपले हे ध्येय म्हणजे 'हिंदवी स्वराज्यतुमचे ,माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे.परक्यांची गुलामी आता नकोउठा,या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करूस्वराज्यस्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणारसारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले.

 ''हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे,असे श्रींच्या मनात आहेश्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया.''शिवराय शेवटी निश्चयाने बोलले.रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले,ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच. शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेलेघडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितलात्या माऊलीला धन्यधन्य वाटलेआपण मणी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा,असा विस्वास त्यांना वाटू लागलाशिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागलेमावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागलेघोडदौड करावी,डोंगरातील आडमार्ग शोधावे,खिंडी,घाट,चोरवाटा निरखाव्या,आसा त्यांचा नित्यक्रम सुरु झालाशिवरायांनी मावळ्यांची अंतःकरने जिंकून घेतलीतरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झालेशिवरायांसाठी जगायचे शिवरायांसाठी मरायचेअसे ते मानू लागलेआता शिवरायांच्या हालचालींना उधाण आले,समुद्राला भरती यावी तसे.शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट,किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारी नजरेने न्याहाळले.चोरवाटा,भुयारे,तळघरे,दारुगोळा,हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली.