राज्याभिषेक
सोहळा
शिवाजी महाराजांनी
या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यानी मान्यता दयावी ,म्हणून राज्यभिषेकाची योजना आखली. ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. शेकडो वर्षांनंतर सर्व धर्माना समतेच्या वागवणारा,प्रजेला
न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे
हे जगाला कळायला हवे,म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. हे त्यांनी
स्वतःच्या सुखासाठी किव्वा वैभवासाठी केले नाही,त्यांनी स्वराज्य भक्कम करण्यासाठी
केले. रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली.
स्वराज्यस्थापनेच्या
कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली,पण न डगमगता शिवराय मोठ्या शौर्याने व चातुर्याने
पार पडले. तानाजी बाजीप्रभू मुरारबाजी
यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वेचले.
स्वराज्य उभे राहिले व शत्रूवर वाचक बसला. शिवरायांनी
प्रतापगडाच्या भवानीमातेचे दर्शन घेतले तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले.
नंतर शिवरायांनी सोन्याचे सिहासन तयार करुवून घेतले. त्याला मौल्यवान रत्ने जडवली.
त्यावर शुभ्र छत्र बसवले. विद्वान ब्राह्मण सरदार कामदार यांना आमंत्रणे गेली. राज्याभिषेकाचे
पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. ते थोर पंडित होते. शिवरायांनी राज्याभिषेकाची
तयारी याथासांग केली. सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणले. रायगडावर पन्नास हजार माणसे
जमली. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस होता तो वाद्ये वाजू लागली. गवई गाऊ
लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्रचामरे
धरण्यात आली. दही, तूप, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते.
गागाभट्ट यांच्या हातात
सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा,यमुना,गोदावरी,सिंधू,कृष्णा,नर्मदा,कावेरी या सात
नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते. गागाभटांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या
डोक्यावर धरली. व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या शंभर छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला. नंतर शिवराय जिजामातेच्या पाया पडले. त्यांच्या
डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या तीस वर्षाचे चीज झाले. मासाहेबांचा भेटीनंतर शिवराय सिहासनावर बसले. त्यांच्याजवळ
महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूला उभे
राहिले. गागाभट्टांनी सोन्यामोत्याच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले. व
ते मोठ्याने म्हणाले,क्षत्रीयकुलावतंस सिंहासनाधीशवर श्रीशिवछत्रपती यांचा विजय असो.
सर्वांनी जयजयकार केला गडावर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्राभर शिवरायांचा जयजयकार झाला.
अशा प्रकारे शिवरायांचा राज्याभिषेक झाला.
No comments:
Post a Comment