Showing posts with label होता जीवा म्हणून वाचला शिवा. Show all posts
Showing posts with label होता जीवा म्हणून वाचला शिवा. Show all posts

Wednesday, 12 July 2017

Jiva Mahale History in Marathi

जिवा महाले (Jiva Mahale History in Marathi)
जिवा महाले हा महाराजांचा अत्यंत विश्वासूमहाराजांचा अंगरक्षकजिवा महाले तालवार बाजीमध्ये अत्यंत पटाईत होतामहाराजांनी अफजलखानाच्या पोटात बिचवा सारलाखान दगा दगा म्हणून ओरडू लागलाते  ऐकून खानाचा रक्षक सय्यद बंडा धावून आलातो महाराजांवर वार करणार तोच जिवा महालाने मोठ्या 
चपळाईने सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवलाबंडाला त्याने ठार केलेआणि महाराज बचावलेहोता जिवा 
म्हणून वाचला शिवाअसे मोठ्या कौतुकाने महाराज त्याला म्हणालेमराठेशाहीची भिस्त जिवासारख्या 
विश्वासूनिधड्या छातीच्या वीरांवरच अवलंबून होतीशिवरायांनी मराठ्यांच्या मदतीने दक्षिणेत स्वतःचे 
राज्य उभे केलेरयतेने त्यांना राजा मानलेआपल्या राजाच्या शब्दासाठी प्राण पणाला लावून लढणारी माणसेही शिवरायांकडे होतीराजांनी आता अनेक गडकिल्लेही काबीज केले होतेकिल्लेमुलुख सर्वत्र भगवा झेंडा  फडकतो आहेया बातम्यांनी विजापूरच्या दरबारातील प्रत्येकाचीच झोप उडाली होतीतमाम आदिलशाहीलाच 



आता या शिवरायाला कुठे अन कसे थांबवायचे हा गहण प्रश्न पडला होतादक्षिणेस जायचं आणि शिवाजीचा 
बंदोबस्त करायचाबोला हे काम कोण करेलहा पैजेचा विडा कोण उचलणार,दरबारातले सारे वातावरण गंभीर आणि चिंताग्रस्त झालेले असताना विजापूरच्या दरबारातील एक भव्य भव्यदिव्यतुफानी ताकदीचंपोलादी  मनगटाच व्यक्तिमत्व उठून उभ राहीलतो होता अफजलखानअफजलखानाने हे धाडस दाखवले.
त्याला आणखी एक कारण होतेत्याच्याकडे प्रचंड ताकद होतीअफाट सैन्य होतंदारुगोळा आणि शस्त्रास्त्रे  होतीबारा वर्षे तो वाईचा सुभेदार होतात्यामुळेच त्याला सारा मराठी मुलुखमराठी माणसंत्यांचं सामर्थ्य 
आणि काही मंडळींच्या कमजोऱ्या माहित होत्याप्रचंड मोठया फौजेनिशी पैजेचा विडा उचलून अफजलखान 
जेव्हा महाराष्ट्राच्या मोहिमेवर आलात्यावेळी शिवराय राजगडावर होतेखान येतोय हि वार्ता मिळताच 
राजांनी मासाहेबांच्या परवानगीने राजगड सोडला आणि प्रतापगडावर प्रस्थान केले.

Jiva Mahale History in Marathi जिवा महाले यांची स्वराज्य सेवा 

अफजलखानाच्या भेटीला जाताना राजांनी माता जिजाऊ ह्यांना वंदन केलेभवानीमातेचे दर्शन घेतलेअंगात चिलखतवर जरीचा अंगरखाडोई जिरेटोपत्यावर मंदिल बांधलाडाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली
अस्तिनात बिचवा लपवलाआणि सर्व तयारी करून शामियान्याच्या दाराशी हजर झालेखान तर आधीच 
येऊन शामियान्यात बसला होतात्याच्या मनात माझ्या शक्तीला घाबरून शिवाजी फक्त शरणार्थीसारखा 
मला भेटायला येतोयहा जणू माझा विजयच आहेअशा थाटात आणि काहीसा रमलेल्या स्तिथीत तो होता.
त्यावेळी खानाजवळ सय्यद बंडा नावाचा हत्यारबंद गडी उभा होतामहाराजांच्या वकिलाने प्रथम सय्यद बंडासदूर करावे अशी विनंती केलीखानाने आपल्या दाढीवर हात फिरवत सय्यद बंडास दूर केलेआणि दुसऱ्याच 
क्षणी शिवरायांनी खानाच्या दिशेने  आपली पावले उचललीया राजे या भेटा आम्हाला .. असे म्हणून आपले 
दोन्ही बलदंड बाहू पसरून अफजल खान पुढे आलाखान उंच धिप्पाड होतातर शिवाजी महाराज वामनमूर्तीच.खानाने भेटीचे नाटक करून महाराजांना आपल्या कवेत घेतलेत्यांची मान आपल्या कवेत दाबली आणि आणिमहाराजांच्या अंगावर कट्यारीचा वार केलाअंगावरचा अंगरखा फाटला पण चिलखताने आपले काम चोख 
केले. घाव पडला पण लागला नाहीत्याच वेळी आई भवानिचं स्मरण करून महाराजांनी खानाच्या पोटात 
वाघनखे घुसवलीबिचवा काढला आणि तो खानाच्या पोटात घुसवलाखान दगा दगा म्हणून मोठ्याने 
ओरडलाखानाचा आवाज ऐकून सय्यद बंडा शामियान्यात घुसलात्याने महाराजांवर घाव घालण्यासाठी पट्टा 
हातात उचललापण तेवढ्यात तो घाव महाराजांवर पडण्यापूर्वीच महाराजांचा  सच्चा सेवक जिवा महाला हा 
धावून पुढे आलात्याने एका घावातच सय्यद बंडाला यमसदनास पाठवले  राजांच्या जीवचे रक्षण केलेआणिसेवक धर्माचे पालन केलेया पराक्रमाचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला गेला त्या वेळी सर्वांच्या तोंडून जे शब्द 
निघाले ते शब्द होते होता जिवा म्हणून वाचला शिवा.....