जाणत्या राजाचे व्यवस्थापन
व्यवस्थापनशास्त्राचे
अवास्तव रान सर्वत्र
माजलेले दिसते. आणि खरे
रान कमी होत
चालले आहे. अद्यापि
एखाद्या कंपनी पलीकडे जाऊन
सामान्य रयतेला, राष्ट्राला जगाला
सुखी करण्यात त्याला
यश आलेले नाही.
शिवाजी महाराजांनी जे
स्वराज्य उभे केले ते
उत्कृष्ट नियोजन व सुक्ष्म
व्यवस्थापन शास्त्राशिवाय शक्यच नव्हते. रामायण
आणि महाभारत हे
दोन ग्रंथ म्हणजे
राजांचा व्यवस्थापनेचा अभ्यास. चाणक्याचा महाराजांनी
अभ्यास केला होता
कि नाही ते
इतिहासाला ठाऊक नाही.
परंतु समर्थाच्या दासबोधाचा
त्यांनी निश्चित परामर्श घेतला.
खरे व्यवस्थापन हे
मनाचे असते. म्हणून
व्यवस्थापनशास्त्र हे मनाचे
शास्त्र म्हटल्यास वाउगे ठरू
नये. लोकांचे,जनतेचे
कल्याण करणे हा
त्यांचा व्यवस्थापनाचा पाया होता.
औरंगजबाप्रमाणे ते स्वार्थपणा,रानटीपणा,दुसऱ्याच्या शोषणावर
आधारलेले नव्हते. वापरा आणि
फेका हे कचरा
निर्माण करणारे व्यवस्थापन त्यांनी
राबवले नव्हते. अफाट लोकसंग्रह,त्यांच्याशी संपर्क साधने,रयतेचे जनमत चाचपणे,त्यांचे लोकशिक्षण व
त्यांच्या मूलभूत गरजा पाहणे
ह्या सर्वांना राजे
प्राधान्य देत असत.
स्वराज्याचे आर्थिक नियोजन,न्यायव्यवस्था,सॊरक्षणसिद्धता,परराष्ट्रखाते,धर्मकारण, समाजकारण आणि
राजकारण यांचा अचुक समन्वय
महाराजांनी साधला होता. महाराजांची
इतिहासात डोकावून पाहण्याची शक्ती
विलक्षण होती. इतिहास म्हणजे
अनुभव,महाराजांनी स्वतःच्या
व दुसाऱ्यांच्या अनुभवातून
शिकण्याची क्षमता दांडगी होती.
कोणत्या वेळी नेमके
काय करावे आणि
काय करू नये
याचा महाराज अगदी
अचूक निर्णय घेत
असत. इतिहासाचे अवलोकन
करूनच महाराजांनी नवा
इतिहास घडवला होता. इतिहासाचा
अभ्यास करूनच महाराजांनी आपल्या
स्वराज्याचा भूगोल वाढवला होता.
महाराज संकटांकडे संधी म्हणून
पाहत होते.
जमले
तर राजकारण नाहीतर
शिक्षण हे त्यांचे
प्रमुख सूत्र होते. राजे
सतत विचारशील व
क्रियाशील असत. आपापले
स्वराज्य कसे वाढवावे,रयतेला सुखी कसे
करावे. दुर्जनांचा निप्पात कसा
करावा. आपल्या राष्ट्राची उन्नती
कशी होईल ह्याचेच
ते सर्वत्र चिंतन
करत असत. राजे
पुरंदरच्या ताहासाठी मिर्झाराजेंच्या छावणीत
गेले होते. तेव्हा
तेथे मनुची नावाचा
एक गृहस्थ होता.
राजांनी ह्या माणूची
बरॊबर बातचीत केली.
अर्थातच हा वाडा
महाल बांधायला किती
वर्षे लागली त्या
महालात किती हिरे
जड्वले. त्याचे दगड कुठून
आणले अशीं वरपांगी
चर्चा केली तर
नसणारच,राजांनी मनुचीकडून युरोपचे
धर्मकारण,समाजकारण,व राजकारण
याची चांगली माहिती
मिळवली होती. या माहितीचा
वापर महाराजांनी आपल्या
पुढील समाजकारण राजकारणात
केला.
महाराज मुळातच
कुशाग्र बुद्धिमत्तेचे,संकटकाळी ती अधीकच
सूक्ष्म होत असे.
माहाराज क्षणाक्षणाला शिकत होते.
ज्ञान वेचत होते.
महाराजांची वृत्ती जिज्ञासू व
अभ्यासू होती. आपल्या कर्मचारी
वर्गामध्ये व रायतेमध्ये
हे गन रुजवण्याचा
ते प्रयत्न करत
असत. सुरतेवर हल्ला
करण्याआधी शिवाजी महाराजांनी सुरतेची
वत्तमबातमी बहर्जी नाईकांकडून मिळवली
होती . येण्या-जाण्याचा मार्ग,त्यांच्या वेळा,मोहिमेची
गुप्तता,अखंड सावधानता
व चपळपणा ह्या
सर्वांचा राजांनी येथे सुरेख
संगम केला होता.
राजे आपल्या आठ
हजार फौजेसह शत्रूच्या
मुलखात तब्बल तीनशे किलोमीटर
आत घुसले होते.
ते सुरतेला जात
असताना कोंढाण्याच्या बाजूने सहा किमी
नटरावरून जात होते.
त्याचवेळी मुघलांचा जयवंतसिह नावाचा
सरदार कोंढाण्याला वेढा
देऊन होता. परंतु
त्यालाही हि गोष्ट
कळली नव्हती,महाराज
असे चालाख होते.
राजांची नजर गरुडासारखी
होती. महाराज छोट्या
छोट्या गोष्टीही बारकाइने पाहत
असत. हेच महाराजांचे
सूक्ष्म व्यवस्थापन होते.
No comments:
Post a Comment