छत्रपती संभाजी महाराज
शहाजीराजांचे
थोरले पुत्र संभाजीराजे
यांना अफजलखानाने दग्याने
ठार केले होते.
जिजाऊसाहेब दुःखी होत्या. पण
लवकरच एक चांगली
बातमी पुरंदरावरून आली.
सौ. सईबाईसाहेबानी पुत्रास
जन्म दिला. महाराजांना
आनंद झाला. त्यांनी
बाळाचे नाव 'संभाजी'असे ठेवले.
बाळराजे संभाजी आपल्या शूर
काकांचा वारसा घेऊन जन्माला
आले. दि. १४
मे १६५७ अफजलखान
स्वराज्यावर चालून आला होता.
दिवस धामधुमीचे होते.
त्यातच सईबाईंची तब्बेत ढासळली.
संभाजी बाळाला अंगावरचे दूध
मिळत नव्हते. जिजाऊंनी
धाराऊ नावाच्या स्त्रीची
बाळराजांना दुधासाठी व्यवस्था केली.
सईबाईसाहेब राजगडावर इ.स.
५ सप्टेंबर १६५९
रोजी स्वर्गवासी झाल्या.
शंभूबाळ केवळ दोन
वर्षाचा होता. महाराज स्वराज्यस्थापनेच्या
कार्यामध्ये गुंतलेले,आजीने शंभूबाळाला
आईची माया दिली.
पुढे पुरंदरचा तह
झाला. तहामध्ये ठरलेल्या
अटीनुसार युवराज संभाजीराजे आपल्या
पिताश्रींबरोबर आगऱ्याला गेले. औरंगजेबाने
दग्याने शिवरायांना कैद केले.
शंभूराजे या वेळी अवघ्या नऊ वर्षाचे होते. एवढ्या लहान वयात त्यांच्या कारकिर्दीला प्रारंभ झाला होता. मोठी जबाबदारी त्यांच्या लहानग्या खांद्यावर येऊन पडली. शंभूबाळ फार हुशार होते. सहनशील व समजूतदार होते. महाराज आगऱ्याहून निसटले. शंभूराजे मथुरेला कृष्णाजी त्रिमळ यांच्याकडे राहिले. इकडे बाळराजे वारले म्हणून स्वराज्यात आकांत चालू होता. पण औरंगजेबापासून शंभुराजांना वाचवण्याकरिता शिवरायांनीच हि अफवा पसरवून दिलेली होती. नंतर यथावकाश शंभूराजे सुखरूप स्वराज्यात आले. शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी संभाजीराजे सतरा वर्षांचे होते. जिजाऊसाहेब फार वृद्ध झाल्या होत्या. राज्याभिशेखा नंतर अवघ्या अकरा दिवसांनी त्यांना देवाज्ञा झाली. शंभूराजांचे मायेचे छत्र हरपले. सोयराबाईसाहेब व इतर आया होत्या परंतु संभाजीराजांना फारच एकटे वाटू लागले. महाराज सतत मोहिमेमध्ये गुंतलेले असत. शंभूराजांचे मन भांबावले होते. महाराजांनी आपल्याला शाबासकी द्यावी असे त्यांना सारखे वाटत होते. महाराजांचे शंभुराजांवर फार प्रेम होते. पण आईची माया केवळ आईच देऊ शकते. संभाजीराजे संस्कृतमध्ये प्रवीण होते.
त्यांनी ग्रंथलिखानही केले होते. ते जाणते होते. पण हात पराक्रमाला शिवशिवत होते. अखेर सिंहाचाच छावा तो संभाजीराजे व सौ. येसूबाई यांना लवकरच कन्यारत्न झाले. मुलीचे नाव भवानी ठेवले. युवराज संभाजीराजे तडखाफडकी मोगलांना जाऊन मिळाले. सारेजण हादरले. औरंगजेबाने दिलेरखानाला संभाजीराजांना घेऊन येण्यास सांगितले. तेव्हा मात्र संभाजीराजे पुन्हा स्वराज्यात आले. त्यांनी महाराजांची माफी मागितली व आपण स्वराज्याची मरेपर्यंत सेवा करू,स्वराज्यासाठी प्राण अर्पण करू अशी शपथ घेतली. केलेल्या चुकीचा त्यांना पच्छाताप झाला. शिवाजीराजांचे दि. ३ एप्रिल १६८० रोजी देहावसाण झाले. संभाजीराजांवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. तरीही त्यांनी न डगमगता शत्रूला सळो कि पळो करून सोडले. महाराज गेल्यानंतर वतनदारानी उचल खाली होती. स्वकीय शत्रूंचा विळखा संभाजीराजाभोवती पडू लागला. संभाजीराजांनी अनेक लढाया केल्या पण एकही गड शत्रूच्या हाती जाऊ दिला नाही. स्वराज्य कमी झाले नव्हते ते संभाजीराजांनी व्यवस्थित सांभाळले होते. पण वतणापायी लाचार झालेल्या लोकांनी मोगलांना गुप्त खबर देऊन संभाजीराजांना दग्याने पकडले.
औरंगजेबाचं तो त्याचे डोके एकाच पद्धतीने चालायचे हो मुसलमान नाहितर मर. त्याने संभाजीराजांचे फार हाल केले. पण संभाजीराजे त्याला शरण गेले नाही. संभाजीराजांनी शिवाजीराजांना शपथ दिली होती. स्वराज्याच्या रक्षणाची. ती त्यांनी अखेरपर्यंत पाळली . दि. ११ मार्च १६८९ मध्ये पापी औरंग्याने त्यांची क्रूरपणे हत्या केली. संभाजीराजांसमोर औरंगजेबाचा वैचारिक पराभव झाला होता. संभाजीराजांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन हिंदुधर्माचा गौरव वाढवला. त्यांनी आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यत्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही तर ती अनंत पटींनी उज्वलतर आणि प्रबलशाली केली. आणि प्रचिती लवकरच आली. अवघा महाराष्ट्र आपल्या राजाचा सूड घेण्यास सज्ज झाला. औरंगजेब तीन लाख फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. मराठ्यांनी त्याच्याशी तब्बल वीस वर्ष झगडा सुरु ठेवला. औरंगजेब १७०७ साली अपयशाने मेला परंतु मराठे शाही पूर्वीपेक्षाहि प्रचंड आणि बलवान झाली.
No comments:
Post a Comment