शिवरायांचे आरमार
महाराष्ट्र,
मध्यप्रदेश व राजस्थानात
देशातील सर्वाधिक किल्ले आहेत.
महाराष्ट्रात ६५६ किल्ले
आहेत. बहुतांश किल्ले
सह्याद्री पर्वताच्या शिखरावर आजहि
उभे आहेत. महाराष्ट्राच्या
६५६ किल्ल्यांपैकी १८०
किल्ले शिवाजी महाराजांनी उभारले.
त्यापैकी १३ किल्ले
सागरी होते. सागर
दुर्गाची स्थापना व त्याच्या
रक्षणाची नौसेनेची उभारणी करण्याचे
श्रेय छत्रपती शिवाजी
महाराजांना आहे. महाराषट्रातील
किल्ल्यात सर्वोच्च किल्ला सालेरगड
आहे. तो नाशिकजवळ
असून त्याची उंची
१६१२.३ मीटर
आहे. सातवाहन राजाने
उभारलेला घोडप हा
दुसरा उंच किल्ला
आहे. महाराष्ट्राचे किल्ले
एकाहून एक मोठे
आहेत. गोंड आदिवासींचा
किल्ला
नरनाळा आहे. सहगड,रायगड,वज्रगड,प्रतापगड,सिधुदुर्ग,मुरुड,जंजिरा,हरिश्चन्द्रगड,वसई,अहमदनगर,तोरणा,लिंगना इ.
किल्यांची प्रदीर्घ साखळी आहे.
सागरात बसलेल्या मुरुड जंजिरा
किल्ल्यास साऱ्या जगात तोड
नाही. राजस्थानात एकूण
२५० किल्ले व
गढ्या आहेत. सर्वाधिक
किल्ले मेवाडात आहेत.
मेवाडात एकट्या राजाने ३२
किल्ले. व गढ्या
उभारल्या. राजस्थानच्या ढुंढाढ प्रदेशात ५२
किल्ले,मारवाडचे नवकोट,राजस्थानच्या
किल्ल्यांचे स्थापत्य फारच प्रगत
आणि समृद्ध होते.
मध्य प्रदेशात ३३०
किल्ले आहेत. त्यापैकी बहुतांश
जर्जर आहेत. छत्तीसगड
नावाप्रमाणेच छत्तीस किल्ल्यांचा प्रदेश
आहे. बुंदेलखं आणि
बघेलखंड व नेमाडक्षेत्र
उध्वस्त किल्ल्यांनि गजबजलेले आहे.
गढामंडला राज्यात रायसेन किल्ल्यासह
५२ किल्ले होते.
बुंदेलखंड आणि बाघेलखंडात
कालिंजर,अजयगड आणि गुरंगीचे
किल्ले अभेद्य होते. यातील
काळलिंजर तर देशातील
सर्वात जुना किल्ला
आहे. येथे जाण्यात
आजही लोकांना अडचण
येते. कर्नाटक, आंध्रप्रदेश,
आणि तालिनाडूच्या किल्ल्यांचे
स्थापत्य शिल्पदृष्टीने महत्वाचे आहे. बादामीचा
किल्ला चालुक्य काळातीला आहे. त्याची उभारणी किल्ल्याच्या आदर्शानुसार
झाली.
हंपीच्या अवशेषात विजयनगरच्या साम्राज्याचे
वैभव प्रतिबिंबात होते. विजयनगरचा किल्ला बराच मजबूत
होता. पण तालिकोटच्या
लढाईत या किल्ल्याच्या
भीतीने दक्षणेतील सर्व सुलतानांनी
हा किल्ला काबीज
करण्यासाठी सर्व सक्ती
एकवटून हल्ला केला.
आपल्या
देशात किल्ले,कोट,गढ,गढ्या
शेकडोंच्या संख्येने आहेत. यांच्या
सावलीतील रानमहालांची ये- जा
नुपूरांचा झणकार,किल्ल्यावरील शहनाई,हत्तीच्या गर्जना,नगाऱ्याचा
युद्धकोष,राजसत्तेची कारस्थाने बलिदानाची
गौरवशाली परंपरा आणि जौहरच्या
ज्वालेच्या अनेक लोककथा
लोकजीवनावाच्या अभंग अंग
झाल्या आहेत. या किल्ल्यांनी
अनेक लढाया आणि
अनेक कत्लेआम पाहिले
आहेत. त्याच्याबलिदानाचा वारसा
आजही गौरवपूर्ण भूतकाळास
जिवंत करतो. प्रत्येक कथा
नव्या पिढला प्रेरणा
देते. या कथांच्या
आधारे प्रत्येक पिढी
आपल्या पूर्वाजांच्या गौरवपूर्ण इतिहासाला समजण्याचा
प्रयत्न करते. या किल्यांच्या
जय-पराजयांच्या लपलेल्या
कथा संघर्षशील इतिहासाला
वर्तमानाशी जोडतात. असा कोण
माणूस आहे कि
जो चित्तोडला जाऊन
तेथील मातीस वंदन
करीत नसेल. रणथंबोर
दुर्गापेक्षा राष्ट्रीय भावनेच्या ऐक्याचे
उदाहरण कोण दाखवेल.
तेथे आजही मंदिर,मस्जिद,व गिरिजाघर
एकत्र उभे आहेत.
रायगड,प्रतापगड,विजापूर,गोल कुंडा
आणि बेदारच्या किल्यांस
पाहून तत्कालीन राज्यकर्त्यांची
दूरदृष्टी दिसून येते.
No comments:
Post a Comment