मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती. त्या वेळी दिल्लीचा औरंगजेब हा मुघल बादशाहा होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या होत्या. त्यामुळे बादशाहा चिडला. त्याने त्याने आपला मामा शायिस्ताखान याला पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढे पुढे येत होता. पण एकदा डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला घाटले. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाईस्ताखानाचे सैन्य हैराण झाले. कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला. मग शाइस्तेखान पुण्याकडे वळला. प्रथम त्याने चाकांचा किल्ला घेतला.चाकणच्या किल्ल्यात फिंरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुनकीने शाईस्ताखानाशी मुकाबला केला. दोन महिने फिरंगोजींने किल्ला लढवला. पण शाईस्ताखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही.
शाईस्ताखान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या
लाल महालात मुक्काम ठोकला.त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. एक वर्ष गेले दुसरे
वर्ष गेले पण खान काही लाल महालातून हालेना. त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलुख उध्वस्त
केला. शायिस्तेखानाची खोड मोडायचीच,असे शिवरायांनी ठरवले. खान लाल महाल बळकावून बसला
होता हे एका दृष्टीने चांगले होते. कारण त्या वाड्यातील खोल्या,दालने,खिडक्या,दारे,वाटा,चोरवाटा
यांची शिवरायांना सगळी माहिती होती. खुद्द शायिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे
आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. शिवरायांनी दिवस निश्चित
केला. वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती. शेकडो स्त्री-पुरुष नटून थटून चालले होते.
शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते. वरात पुढे निघून गेली.
शिवराय आणि
मावळे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. या वेळी शायिस्ताखान गाढ झोपलेला होता. वाड्याच्या
भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता. शिवरायांच्या
मावळ्यांनी खानाच्या पहारेकऱ्यांना बांधून टाकले.
इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धाऊन आला. शिवरायांनी त्याला ठार केले.
तो शायिस्ताखानाचा मुलगा होता.
गडबड झाली लोक जागे
झाले. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. समशेर उपसली. शायिस्ताखान घाबरला.
सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागे धावले. शायिस्ताखान
खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार,तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची तीन बोटे कापली
गेली. प्राणांवर आले पण बोटांवर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शायिस्ताखान
ने तर हायच खाल्ली. आज बोटे तुटली,उद्या आपले शीर शिवली कापून नेईल. अशी भीती त्याला
वाटू लागली.
No comments:
Post a Comment