दुर्गपुत्र छत्रपती श्री शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज दुर्गपुत्र होते.
त्यांचा जन्म शिवनेरी
किल्ल्यात झाला. त्यांचे बहुतांश
जीवन या किल्ल्यात
गेले. आणि त्यांनी
शेवटचा श्वासहि किल्ल्यात
घेतला. शिवनेरी जरी प्राचीन
गिरिदुर्ग आहे,पण
त्याची प्रसिद्धी छत्रपतींचे जन्मस्थळ
असल्यामुळे आहे. याचमुळे
ती महाराष्ट्राची पुण्यभूमी
झाली आहे या
किल्ल्यात १९ फेब्रुवारी
१६३० ला छत्रपती
शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
शिवरायांनी माता जिजाबाईसोबत
१६३५ पर्यंत या
किल्ल्यावर बालपण घालवले. नंतर
त्यांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण
बांधले. ते ५३
वर्षाच्या अल्पायुतच दिवंगत झाले.
ते जर आपल्या
समकालीन शत्रूप्रमाणे दीर्घजीवी असते तर
इतिहासाचे रूप काही
वेगळे झाले असते.
शिवनेरी किल्ल्याचा इतिहास बराच
जुना आहे. सध्याची
किल्लेबंदी भलेही मध्ययुगीन असो,पण किल्ल्याचे
बांदकाम प्राचीन काळात झाले
होते. किल्ल्याच्या आसपास
५० पेक्षा जास्त
बौद्ध गुफा आहेत.
नानाघाटाजवळ राजा शातकर्णीचा
जो शिलालेख मिळाला
आहे,तो सातवाहन
युगाचा इ.स.
१०२-इसवी सन
२५० आहे. सिमुक
सातवाहन युगाचा प्रवर्तक होता.
तो मोठा प्रतापी
राजा होता. त्याने
उत्तर भारतात मागधापर्यंत
स्वाऱ्या केल्या होत्या. दक्षिण
पथ व पच्छिम
भागात सुमारे ४००
वर्षे सातवाहनाचे अधिपत्य
होते.
सातवाहन राजा
दुर्गनिर्माता म्हणून प्रसिद्ध आहेत.
इतिहासकारांनुसार शिवनेरी किल्ल्याची स्थापना
सातवाहनांनी केली. तरीपण मेहराब,मिनार व मशिदीवरून
स्पष्ट होते कि,
मुस्लिम काळातही तेथे बरेच
बांधकाम झाले व
किल्लेबंदी मजबूत करण्यात आली.
सातवाहनानंतर या क्षेत्रात
चालुक्य व राष्ट्रकूटाचे
राज्य राहिले. ११७०
ते १३१८ पर्यंत
शिवनेरीवर देवगिरींच्या यादवांचे राज्य होते.
त्यानंतर मुस्लिमांचे राज्य सुरु
झाले. नंतर या
किल्ल्यावर निजामशाही,आदिलशाही,मोगल,मराठे व इंग्रजांचे
राज्य राहिले. शिवनेरी
पुण्यापासून ९४ कि.मी. व
मुंबईहून १६० दूर
जुन्नरजवळ सह्याद्री पर्वतरांगेच्या एका
उंच शिखरावर आहे.
चारही बाजूला १०
मीटर उंच किल्ल्यासाठी
अमेध्य ढाल झाली
आहे. दुरून भीमकाय
हत्तीसारखा पहाड मोठा
मनोहर दिसतो. मध्यभागी
बौद्ध गुफा आणि
शिखरावर किल्ला असलेले देशातील
बहुदा एकमेव स्थान
आहे. सौरक्षणाच्या दृष्टीने
शिवनेरी एक विशेष
किल्ला आहे. किल्ल्यात
प्रवेशासाठी सात दरवाजांची
साखळी आहे. एक
कि.मी. चढाई
केल्यानंतर पहिला दरवाजा आहे.
मुख्य दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी
अनेक दरवाजे ओलांडावे
लागतात. मुख्य दरवाजा लाकडाचा
आहे. आणि मूळ
स्वरूपात कायम आहे.
किल्ल्यात मोटारीनेही जाता येते.
आता पक्का रस्ता
झाला आहे. किल्ल्याच्या
चारही बाजूला दुसरेहि किल्ले
आहेत.
पूर्वेला नारायणगढ,उत्तरेला हरिश्चंद्रगढ,तारामतीगढ,पच्छिमेस चावंड,हडसर
व दक्षिणेला रानमाची
आहे. हे क्षेत्र
प्राचीन काळात विशेषतः सातवाहनकातळात
बरेच समृद्ध होते.
त्यामुळे अनेक प्राचीन
किल्ल्यांचे अवशेष या क्षेत्रात
आहेत. शिवनेरी किल्ल्यात
महादरवाजा,बाटवण पीर,शिवबाई
हे दरवाजे आहेत.
या सर्वांची किल्लेबांदी
मजबूत आहे. पाचव्या
दरवाजाच्या कपाटास हत्तीपासून बचाव
करण्यासाठी लोखंडाचे टोकदार खिळे
ठोकले आहेत. किल्ल्याची
तटबंदी बरीच उंच
व निसरडी आहे.
ती शिला कापून
बनविली आहे. दरवाजाच्या
दोन्ही बाजूला मजबूत बुरुज,खंदक व
लाकडाच्या पुलाच्या खुणा आहेत.
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता आहे. पण
तो फार वळणाचा
आणि नागमोडी आहे.
किल्याचे पहिले द्वार १७०
मी. उंचीवर आहे.
त्याच्या पुढे लाकडाचा
उचलण्याचा पूल आहे.
फाटकास घुगुस आणि बुरुज
आहे. शत्रूला रोखण्यासाठी
असलेली तटबंदी आता उध्वस्त
झाली आहे. यानंतर
६६ मी. उंचीवर
दुसरे द्वार आहे.
याला पारवन दरवाजा
म्हणतात. हि तटबंदी
बरीच उंच आहे,व द्वारावर
शार्दुलाची आकृती उत्कीर्ण आहे.
तिसऱ्या फाटकास हत्तीदरवाजा म्हणतात
या फाटकावरही शार्दुलाची
आकृती कोरलेली आहे. कपाटास
लोखंडाचे खिळे लावले
आहेत. १७ मी.
दूर पीर दरवाजा
आहे. हा दरवाजा
दगड कापून बनविला
आहे. हा बराच
मोठा आहे. यानंतर रस्त्याला दोन
फाटे आहेत. एक
रास्ता घोड्यासाठी आणि एक
रास्ता माणसांसाठी आहे.
नंतर
शिवाई नावाचा पाचवा
दरवाजा आहे. येथून
तटबंदीची तिसरी किल्लेबंदी सुरु
होते. डाव्या बाजूला
काही अंतरावर शिवाजीचे
प्राचीन मंदिर आहे. ज्या
पठारावर मंदिर आहे त्याच्या
खाली बौद्ध गुफांच्या
रांगा आहेत. शिवाई
द्वारापासून ८४ मीटर
उंचीवर सहावा दरवाजा आहे.
आणि त्याच्या थेट
समोर २५ मीटर
वेड्यावाकड्या रस्त्यानंतर कुलपकड हा
सातवा दरवाजा येतो.
पश्चिमेकडे तीन ओळी
व सातखोल्यांच्या रांगेजवळ
आंबेरखाना आहे. हि
किल्ल्याची पहिली इमारत आहे.
याशीवाय मुस्लिम युगाच्या राज्यकर्त्यांच्या
महालाचे अवशेष आहेत. आई
जिजामातेने शिवाई देवीची पूजा
करून शिवाजीराजांसारखा पुत्र
मिळविला. व शिवाई
देवीच्या नावाने आपल्या मुलाचे
नाव शिवाजी ठेवले.
शिवाजी महाराजांचा जन्म झाला
ती जागा येथे
पाहता येते. हि
इमारत ढासळली होती,तिचा जीर्णोद्धार
झाला आहे. येथे
शिवाजी महाराज व जिजामाता
यांचे पुतळे आहेत.
काही अंतरावर काला
चौथरा आहे. येथे
१६५० मध्ये मोगल
सैन्याशी युद्ध झाले. शिवनेरीवरील
डोंगरावर सात मीटर
उंच एकमेकांपासून ९
मीटर अंतरावर मेहेरबाची
मशीद आहे. या
मशिदीचे दोन मिनार
सात मीटर उंच
आहेत. सुमारे ३५
मीटर उंच चढल्यावर
मजार व दरगाह
आहे. नेमके याच्या
खाली यादव राजांनी
खोद्लेले तलाव आहे
ते दगड कापून
बनविले आहे. किल्ल्यावर
सुमारे ३० तलाव
आहेत. त्यात गंगा
- यमुना नावाचे तलाव उल्लेखनीय
आहेत. सर्व तलाव
दगड कापून बनविले
आहेत. बहुधा बौद्ध
गुफासोबत या तलावांचे
काम झाले असावे.
वाळवंटात मरुद्यान पाहून सुखद
अनुभूती होते. तसे पर्यटकांना
येथील तलाव पाहून आश्चर्य
वाटते.
उंच पहाडावरून
तलावांना पाहून आनंद होतो.
बौद्ध गुफा सुद्धा
महत्वाच्या आहेत. या चैत्य
गुफा अनेक वर्गात
विभागल्या आहेत. बौद्ध धर्माच्या
हीनयान संप्रदायाचे वर्चस्व असताना
या गुफा कोरण्यात
आल्या. या गुफा
तत्कालीन केलेल्या प्रगतीच्या खुनाच
आहेत. जेथे शिवाजी
महाराजांचा जन्म झाला
व जो किल्ला
जिंकण्यासाठी त्यांनी १६५७,१६७०
आणि १६७६ असे
तीन वेळा प्रयत्न
केले. पण किल्ला
त्यांच्या मृत्यू नंतरच मराठ्यांच्या
हाती आला. याचे
कारण कि,औरंगजेबाने
सर्वात अधिक सैनिक
या किल्यात नेमले
होते. निजाम - उल
- मुल्कयाने १६१४ मध्ये
या किल्ल्याची पहाणी
केली होती. लष्करीदृष्ट्या
शिवनेरी एक केंद्र
असून इतर किल्ल्यांनि
त्याच्याभोवती फेरा धरला
आहे. त्यात शिवनेरी,बहिरवगड,चावंड,हडसर,हरिश्चंद्रगड,जीवधन जुन्नर,कुंजलगड,नारायणगड,पाबर, व
पेमगिरी असे ११
किल्ले आहेत. नाना
घाटाच्या पश्चिमेस बहिरवगड
आहे. हा अत्यंत
कठीण किल्ल्यांपैकी एक
आहे. किल्ल्याचा रस्ता
अत्यंत खडकाळ असून काही
ठिकाणी दोरीच्या साहाय्याने तर
काही ठिकाणी पायऱ्या
आहेत. या पायऱ्यांवरून
एक ट्रॅप डोअर
ने प्रवेश करता
येत होता. महाराष्टीय
लोकांचे या किल्ल्यावर
इतके प्रेम आहे
कि,सध्याच्या महाराष्ट्र
राज्याच्या स्थापनेची घोषणा येथे
२७ एप्रिल १९६०
मध्ये झाली. किल्ला
पाहावयास अर्धा दिवस पुरेसा
आहे. ऐतिहासिक अवशेषांसह
सुरक्षितपणे किल्ल्याचे सौंदर्य वाढले
आहे. किल्ला पाहायला
एक दिवस पुरेसा
आहे. जुन्नर आणि
नाना घाट मध्ये
पूर्व बाजूला चावडचा
किल्ला असून तो
इ.स. १४५७
च्या पूर्वी बांधण्यात
आला. याची मुख्य
ताकत त्याच्या नैसर्गिक
सौरक्षण शक्तीत आहे. इंग्रजानी
किल्ला जमीनदोस्त केल्यामुळे आता
काहीच शिल्लक नाही.
या किल्ल्यात मलिक
अंबरने बऱ्याच सुधारणा केल्या.
निजामशाहीच्या नावे मोगलांशी
लढताना शहाजी भोसल्यांनी या
किल्ल्याचा वापर केला.
काही काळ या
किल्ल्याचा तुरुंग म्हणूनही वापर
झाला. हडसर हा
किल्ला दोन शिखरांच्या
टेकडीवर टेकडीवर असून त्यांना
एका भिंतीने जोडले
आहे. हा किल्ला
उध्वस्त झाला तरी
त्यावरील मंदिर,काही तलाव
आणि भूमिगत कक्ष
पाहता येतात. हा
हि किल्ला शहाजी
राजांनी मोगलांना दिला. जुन्नरहून २५ कि.
मी. अंतरावर प्राचीन
दुर्ग हरिश्चंद्रगड हा
पाच कि.मी.
व्यासाचा प्रचंड किल्ला पुणे
- अहमदनगर आणि ठाणे
जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्याची
मुख्य परकोट शिखराच्या
किंचित खाली आहे.
किल्ल्याचे मुख्य वैशिष्ठ्य त्यातील
असंख्य गुहा,सुंदर
मंदिर आणि दगड
कापून काढलेले सुंदर
कक्ष आहेत. ४००
मीटर उंचीचा सरळसोट
अर्धवर्तुळाकार कड्याचे नाव कोकणकडा
आहे. किल्ल्याचा इतिहास
फारसा महत्वाचा नाही.
निरनिराळ्या घराण्याच्या हाती हा
किल्ला होता. मालशेज घाट
हा पूर्वी नाणेघाटाएवढा
महत्वाचा नव्हता. पण अलीकडे
मालसेज घाट मोटारीच्या
रस्त्याने महत्वाचा झाला आहे.
तर नाणेघाट पायदळमाणसे
आनी पशुंच्या उपयोगाचा
राहिला आहे. जुन्नरपासून
२५ कि.मी
वरील जीवधनचा किल्ला
इ.स. १६००
पूर्वीचा आहे. नैसर्गिक
आणि कृत्रिम अशा
दोन्ही तर्हेपेक्षा दुर्गम्य किल्ल्याचा
चढाव सरळसोट आणि
लांब आहे. याच्या
काही पायऱ्या विटांनी
बांधलेल्या तर काही
दगडातून कापून काढलेल्या आहेत.
एक द्वाराकडे जडत्व
तेथून एका गुहेसारख्या
मार्गाने आतल्या द्वारापर्यंत जातात.
बाराच काळ निजामशाहीचे
या किल्ल्यावर आदिपत्य
होते. मुगल, मराठ्यानंतर
इंग्रजांनी किल्ल्याचा परकोट आणि
पायऱ्या उडवून लावल्या. १००
मीटर उंचीची परकोटाची
भिंत भयप्रद आहे. पुण्याहून ७५ कि.मी. अंतरावरील
जुन्नरचे गाव आणि
किल्ला प्राचीन आहे. किल्ला
शहराजवळ असून बराच
मोठा आहे. परकोट
व बुरुज पडले
असून आतल्या इमारती
हि उध्वस्त झाल्या
आहेत. इंग्रज काळात
तेथे काही कार्यालये
उघडण्यात आली. जुन्नर
हे व्यापारी केंद्र
असून त्याच्या रक्षणासाठीच
हा किल्ला असावा.
आसपासच्या किल्ल्यात सरद देण्याचे
कामही हा किल्ला
करत असावा. गुजालाड
हा नाममात्र नकाशावरच
आहे. नारायणगड हा किल्ला
पुणे जिल्ह्यातील अठराव्या
शतकातील आहे. बालाजी
विश्वनाथ ने तो
बांधून सयाजी पवारास सरजामात
दिला. पण या
वेळी किल्यांचे महत्व
घसरणीत लागले होते. या
किल्ल्याच्या दोन बाजूला
कडे असून एका
बाजूला परकोट आणि बुरुज
आहे. किल्ला उध्वस्त
झाला असला तरी
हत्साबाईचे मंदिर सुरक्षित आहे.
हा किल्ला इंग्रजांनी
जमीनदोस्त केला. पाबरचा किल्ला
हि नाममात्रच आहे.
पेमालेरो उर्फ शहागड
हा बालेश्वर पर्वत
रांगावरचा किल्ला असून मोगलांशी
लढताना शहाजी राजांनी त्याचा
वापर केला. मोगलांनी
हा किल्ला घेतला
पण तो अखेर
पेशव्यांनी जिंकून घेतला.
No comments:
Post a Comment