Friday, 28 July 2017

शत्रूंचा बंदोबस्त





स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त


शिवरायांच्या  अवती भोवती बारा मावळातील मावळे गोळा झाले. महाराज सांगलीतील महत्वाची कामगिरी बजावत होते. स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे,असे ते मावळे मानत होते. आपली माणसे साधी भोळी मराठमोळी माणसे ती होती. त्यांना शिवाजी महाराज म्हणजे त्यांचा जीव कि प्राण वाटत असे,पण काहि लोकांना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे. अशा लोकांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले. खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते. आदिलशहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथवले. कोंढाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला;पण महाराजांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. महाराजांनी त्यांना पिटाळून लावले. तसेच फलटणचे बाजाजी  नाईक  निंबाळकर,हे शिवरायांचे मेहुणे. शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊन लढाया कराव्या लागल्या;तथापि या घराण्यातील व्यक्ती शिवरायांच्या बरोबर राहिल्या. शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते. हा त्यांचा सुपे परागण्या होता. आणि त्यानेही महाराजांविरुद्ध कारवाया सुरु केल्या


शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले. आणि त्याला कर्नाटक प्रांतात पाठवले. कर्तव्यापुढे महाराज नातेगोते मानत नव्हते. शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळ्यांना पटली. आणि त्यांचे नाव सगळीकडे दुमदुमले. शिवराय लोकांचे राजे झाले, पण ते काही लोकांच्या डोळ्यात खुपले. जावळीचे मोरे असेच होते. मोरे हे जावळीचे जहागीरदार होते. त्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती. ते विजापूरच्या आदिलशहाचे जहागीरदार होते. आदिलशहाने त्यांना 'चंद्रराव' हा किताब दिला होता. जावळीचे जंगल खूप घनदाट होते. भरदिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शरकाव नव्हता. त्या घनदाट जंगलामध्ये वाघ,लांडगे,अस्वल,. प्राण्यांचा संचार होता. मोऱ्यांची जावळी जणू वाघाची जावळीच होती. त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कुणीही जात नसे,पण ती हिम्मत केली शिवरायांनी. त्याला कारण असे होते कि दौलतराव मोरे १६४५ साली मरण पावला. आणि नंतर त्याच्या वारसांमध्ये भांडण तंटे सुरु झाले. शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली. महाराजांच्या हदतीनेच यशवंतराव मोरे जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला

आणि त्या वेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबुल केले. त्यांच्या सर्व कार्यात त्यांना मदत करण्याचे हि कबुल केले,पण गादीवर बसल्यानंतर तो सर्व काही विसरला. कुठला शिवाजी आणि कुठला करार. आणि तो बेपर्वाईने वागू लागला. स्वराज्यातील मुलखावर स्वाऱ्या करणे,प्रजेला त्रास देणे,अशी दांडगाई यशवंतराव करू लागला. शिवरायांनी ओळखले कि वेळीच याला थांबवले नाही तर स्वराज्याला धोका आहे. म्हणून महाराजांनी यशवंतराव मोरे याला एक खरमरीत पत्र पाठवले. 'तुम्ही स्वतःला राजे म्हणविता. राजे आम्ही. आम्हांस श्रीशंभूने राज्य दिधले आहे,तर तुम्ही राजे म्हणावे. यशवंराव मोऱ्याने उद्धटपणे उत्तर लिहिले, 'तुम्ही काल राजे  जाहला. तुम्हांस राज्य कोणी दिधले. येता जावळी,जाता गोवली... आम्हांस श्रींचे कृपेने आदिलशहाने राजे हा किताब,छत्रचामर,सिंहासन मेहेरबान होऊन दिधले. येथे उपाय कराल तर अपाय होईल. शिवरायांनी त्यांना उलट उत्तर दिले,'जावळी खाली करून,राजे म्हणोन, छत्रचामर दूर करून,हात रुमाले बांधून,भेटीस येऊन,हुजुराची चाकरी करणे. ईतकीयावर बंडखोरी केलिया, मारले जाल

जावळी भोवती घनदाट जंगल होते. आणि मोरे मंडळीही पुष्कळ होती. रायरीचा किल्ला अजिंक्य होता. जावळी जिंकणे एवढे सोपे नव्हते. म्हणून भरपूर तयारी करून शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली. एक महिनाभर  यशवंतरावाने झुंज दिली,पण त्याचे खूप सैन्य मारले गेले. आणि शेवटी यशवंतराव आपल्या मुलांना घेऊन रायरीवर पळाला. महाराजांनी जावळी घेतली. आणि नंतर राजे रायरीवर चालून गेले. महाराजांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा दिला. यशवंराव तीन महिने लढला,पण शेवटी त्याला माघार घ्यावी लागली. जाणवळीचा विजय फार महत्वाचा होता. आणि त्या विजयामुळे शिवाजी महाराजांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले. आणि शेवटी यशवंरावांचे सैन्यही शिवाजी महाराजांना येऊन मिळाले. रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला. हा किल्ला पाहून महाराजांना धंन्य वाटले. त्यांनी या किल्ल्याचे नाव रायगड ठेवले. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला त्याचे  प्रतापगड हे नाव ठेवले.  




Tuesday, 25 July 2017

महाराष्ट्रातील शिवकालीन दुर्ग




महाराष्ट्रातील  दुर्ग 















शिवाजी महाराज किल्ल्यावर खूप खर्च करतात असे काही अनाहुत हितचिंतकांना वाटले. त्यांनी राजांजवळ चिंता व्यक्त केली. तेव्हा महाराज म्हणाले, ''जैसा कुळंबी शेतात माळा घालून शेत राखतो तसे किल्ले राज्यास रक्षक आहेत. तारवांस नाव खिळे मारून बळकट करतात तशी बळकटी किल्ल्यांची आहे. किल्ल्यांच्या मार्गाने औरंगशहा सारख्यांची उमर गुजरून जाईल.''पुढे अगदी तंतोतंत तसेच झाले. औरंगजेब मेला परंतु महाराजांचे किल्ले आजही आपण पहातो दुर्ग म्हणजे स्वराज्याची शल्पे आहेत. राजे दुर्गावर खर्च करत नव्हते,त्यांनी ती स्वराज्यासाठी,स्वराज्याच्या भावी पिढ्यांसाठी केलेली गुंतवणूक होती. राजे दुर्गामातेचे पुत्र होते. ते दुर्गांची पूजा करीत असत. आणि दुर्गांवरती राहत असत. महाराष्ट्राच्या दुर्गानी राष्ट्राचे सौरक्षण निर्मितीमध्ये फार मोलाची भूमिका बजावली. ते भाग्य राजस्थानातील सुंदर महालांच्या नशीबी आले नाही. महाराष्ट्राचे दुर्ग म्हणजे भारतमातेच्या मुकुटातील गौरवमानी. हिंदुस्थानचे पुनरुज्जीवन महाराष्ट्राच्या या ओबड धोबड दुर्गानीच केले आहे. त्यांची तुलना राजपुतांच्या महालांशी होऊ शकत नाही.


 रत्नाजडित  म्यानामध्ये पडून राहिलेल्या सोनेरी तालवारीसारखेच राजपुतांचे महाल आहेत. त्यांनी स्वातंत्र्याची हवा कधी अनुभवलीच नाही. राजपुतांचे महाल म्हणजे मूर्तिमंत शापित सौंदर्य आहे. लढाईत शौर्य गाजवून आलेल्या सैनिकांचे सौंदर्य कशात आहे,आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी त्याने शरीरावर अनेक घाव झेललेले असतात. त्या सर्वांच्या खुणा तो चेहेऱ्यावर,अंगावर मोठ्या गौरवाने मिरवत असतोत्या रक्ताळलेल्या खुणा म्हणजे स्वातंत्र्य देवतेने त्यांना केलेले कुंकुम-तीलक होय. त्या जखमा म्हणजे स्वातंत्र्य देवतेचे सौभाग्य होय. सौभाग्याची तुलना हि हिरे,माणिक,मोती पाचू इत्यादीने केली जात नाही. स्वातंत्र्य देवाता बाह्य सौंदर्यावर फिदा होत. नाही. पुरुषार्थाला ती जीवेभावे ओवाळते. महाराष्ट्राचे लढवय्ये दुर्ग असूनही त्या शौर्याच्या खुणा,स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अंगावर बाळगून आहेत. ह्या दुर्गांकडे पाहिले कि मन भरून येते. स्वातंत्र्य-देवतेने दिवस रात्र एकत्र करून घडवलेली ती शल्पे आहेत. आपल्या रक्त अश्रूंचा अभिषेक तिने त्या शिल्पांवर केला आहे. स्वराज्याची सुगंधी फुले त्यावर उधळलेली आहेत. आणि त्या अप्रतिम शिल्पाला तिने मनोभावे वंदन केले आहे. महाराष्ट्राचे दुर्ग म्हणजे काळे पाषाण आणि दगडगोटे नाहीत

हे दुर्ग म्हणजे स्वराज्याच्या शिल्पकाराने शिवरायांनी घडवलेली स्वराज्याची महान शील्पे आहेत. जेव्हा कधी आपण ह्या दुर्गावर जातो तेव्हा शिवरायांचा भीम पराक्रम साक्षात डोळ्यापुढे दिसू लागतो, घोड्याच्या टापांचा आवाज कानामध्ये घुमू लागतो,श्वासामध्ये स्वराज्याचा प्रेमळ सुगंध दरवळत रहातो. डोळ्यांमध्ये कृतज्ञतेच्या गंगा-यमुना वाहू लागतात,अंतःकरण पवित्र होते,मनाची जळमटी निघून जातात आणि एका नव्या उमेदीने स्फूर्तीने जीवनाचे युद्ध खेळायला मर्द मराठा गडी सुसज्ज होतो. भक्त प्रल्हादाला भगवान विष्णू दगडी स्तंभामध्ये दिसले होते असे म्हणतात. आपल्यालाही या पोलादी दुर्गांमधे स्वराज्याच्या नरर्सिह राजाचे दर्शन होईल. आज भले या नरसिहाचे सोन्याचे सिंहासन कुठे अस्तित्वात नसेल परंतु हा नरश्रेष्ठ आमच्या हृदयस्थ सिंहासनावर कधीच विराजमान झालेला आहे,आणि तो आम्हाला सदैव प्रेरणा देत आहे. अशा या पवित्र शिवतीर्थाची चिमूटभर धूळ आपल्या कपाळी धारण करू या. खरोखरच आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. कुणी सांगावे,या धुळीमधूनच पुढे भविष्यात,अनुकूल वेळी एखादा वीर शिवाजी पुन्हा जन्माला येईल.






Monday, 24 July 2017

बहुरूपी हेर बहिर्जी नाईक



बहिर्जी नाईक

महाराजांचा असाच एक विस्वासू बहुरुपिया चोख बातमीदार म्हणजे बहिर्जी नाईक बहिर्जी नाईक हा शिवाजी 
महाराजांचा अत्यंत विस्वासू नजरबाज होताआणि बहुरूपी हि होतामहाराजांनी त्याला हेरखात्याचा प्रमुखपदीनेमले होतेबहिर्जी शत्रूंमध्ये शिरून महत्वाची बातमी घेऊन येत असेबहिर्जी हा महाराजांचा अत्यंत विश्वासू 
नजरबाज होतातरबेज बहुरूपी होतामहाराजांनी ह्याला हेरखात्याच्या प्रमुखपदी नेमले होतेबहिर्जी शत्रूगोटात जाऊन महत्वाची बातमी घेऊन येत असेसुरत हि औरंगजेबाची सोन्याची लंका होतीया लंकेची खडानखडा माहिती बहिर्जीने महाराजांस कळवलीत्याने दिलेल्या अचूक माहितीच्या आधारानेच महाराजांनी सुरतेवर 
आक्रमण केलेआणि स्वराज्यास अमाप संपत्ती मिळाली.सुरत हि औरंगजेबाची सोन्याची लंका होतीया लंकेची सर्व अचूक माहिती बहिर्जीने महाराजाना कळवलीसुरत शहरावर हल्ला करायचा,तिथली बाजारपेठ 
लुटायचीशत्रूच्या कैदेतुन आपल्या श्रमलक्ष्मीला आणायचे त्यासाठी तेथील शहराची आणि सुरक्षिततेची 
माहिती काढणे महत्वाचे होतेशत्रूच्या गोटात जाऊन त्याच्याच विरुद्ध माहिती गोळा करायची हे काम काही 
सोपे नव्हतेआणि म्हणूनच या जोखमीच्या कामगिरीवर महाराजांनी बहिर्जी नाईक याला पाठवले


बहिर्जी नाईक यांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारानेच महाराजांनी सुरतेवर आक्रमण केले होतेस्वराज्यास अमाप  संपत्ती मिळालीबहिर्जी नाईक तेज दिमाखाचानाटकीआणि शिवाजी महाराजांचा सच्चा इमानी सेवक, बहिर्जींचे घराणे जाधवांचेत्याच्या अशाच खास गुणांमुळेच महाराजांनी त्याची निवड केली होतीपंतांचा सल्लामानून महाराजांनी लगेच बहिर्जी नायकाकडे एक सांगावा पाठवलातो निरोप मिळताच मोठया आनंदाने 
घोड्यावर टांग मारलीवाऱ्याच्या वेगाने येऊन तो शिवरायांपुढे उभा राहिलामहाराजांना मानाचा मुजरा करीत म्हणाला,राजे आज या सेवकाची खास याद काढलीकाही विशेष कामगिरी,''होय बहिर्जी कामगिरी खरंच विशेष आहे,आम्हाला त्या कामी तुमची गरज आहेआमचा मनसुबा आहे कि,राज्याचा रिता होणारा खजिना भरण्यासाठी सुरतेची लूट करायचीमहाराज तुम्ही निश्चित राहा हि हेरगिरीची कामगिरी फत्ते झालीच म्हणून
समजा. फक्त थोडी मोहोलत असावीबहिर्जी म्हणालाकामगिरी कळलीमहत्व समजलेपंत आणि 
महाराजांना वंदन करून,त्यांचे आशीर्वाद घेऊन बहिर्जी नाईकाने आपल्या दोन साथीदारांसह सुरतेकडे तातडीने प्रयाण केलेराजगडापासून ते तापी तीरावरील त्या सोन्याच्या लंकेचा सुरतचे अंतर दीडशे कोसाचे

शहराभोवती भली मोठी वेत्या गावात प्रवेश करायचा तर बऱ्हाणपूरच्या भव्य पोलादी दरवाजातून करावा 
लागेप्रवेशद्वारावर पहारेकऱ्यांचा सक्त खडा पहारागावाजवळ इंग्रज आणि आणि त्यांच्या वखारी सुरतेची 
बाजारपेठ म्हणजे  सोने, चांदीजड जवाहीरउंची रेशमी कपडेदागदागिनेऐषोआरामाच्या आणि चैनीच्या 
वस्तूशहराच्या मध्यवर्ती भागात एक भुईकोट किल्लाकिल्ल्याच्या रक्षणाची पूर्ण जबाबदारी किल्लेदार  इनायतखान याचीकिल्ल्याबरोबर त्या श्रीमंतांच्या निवासस्थानाची,भव्य दिव्य बाजारपेठेची,सगळ्या वैभवाची रक्षणाची जबाबदारी इनायत खान याचीत्याच्या इशाऱ्यावर शत्रुवरती तुटून तुटून पडण्यास सज्ज पाच  हजार सैन्यअशा या सुरतेत बहिर्जी नाईक आणि त्याचे दोन साथीदार ह्यांनी मोठ्या चतुराईने शहरी वेषांतर करून प्रवेश मिळवलाआपल्या शोधक नजरेनं बहिर्जी आपल्या साथीदाराच्या मदतीने टेहाळणी करत  असताना चौकीवरील पहारेकऱ्याच्या ते नजरेस आले.त्याने तिघांनाही हटकले त्यांची चौकशी केलीमात्र बहिर्जीने गोड मिठास भाषा वापरली आम्ही शाहीर मंडळी कामधंद्याच्या इराद्याने नगरीत आश्रयाला आलो
आहोतअशी खात्री पटून दिलीपहारेकऱ्यांनी त्या तिघांना किल्लेदारासमोर पेश केलेसुरतसारख्या शहरात  मराठी माणसांना पाहून इनायातखानला आश्चर्य वाटलेपण बहिर्जींचे भाषाचातुर्य आणि इनायातखानाच्या 
नगराची तोंडभरून केलेली स्तुती ऐकून इनायतखान खुश झाला

बेहद खुश झालेल्या इनायतखानाने बहिर्जी नाईक आणि त्याचे साथीदार यांची खास मेहमान म्हणून विशेष व्यवस्था केलीइनायतखानाचा पाहुणचार घेतअसताना बहिर्जीला एक संधीच मिळालीत्याने किल्ल्याची सुरक्षा,चोरवाटा,आतला दारुगोळा,फौज याची बातमी गोळा केलीआणि एक दिवस बाजारपेठ फिरून येतो अस म्हणूनबहिर्जी आला तो राजगडावरचमहाराजांची भेट घेऊन बहिर्जीने महाराजांना खूप माहिती पुरवलीराजांनी बहिर्जीच्या चातुर्याच कौतुक केलंमाय भवानीचा आशीर्वाद घेऊन महाराजनेताजी पालकर,बहिर्जी नाईक आणि भली मोठी फौज घेऊन सुरतेच्या मोहिमेवर निघालेबहिर्जींनी बरोबर मार्ग दाखवला आणि शिवरायांची फौज सुरतजवळच्या उधना या गावी येऊन धडकलीनेमकी हि बातमी इनायत खानाच्या हेरांना लागलीत्यांनी खानालासावध करण्याचा प्रयत्न केलापण खानाने त्या वार्तेची गंभीर दखल घेतली नाहीशिवाजी सुरतेवर हल्ला करायला आला आहे,या वार्तेनेसुरतमधली मालदार मंडळी हवालदिल झालीकाहींनी तर गावच सोडले डचइंग्रज ह्यांनी आपापल्या वखारी वाचवण्यासाठी संरक्षणफळी उभी केलीसारं सुरत शिवाजी येतोय ता वार्तेने भयभीत झाले.