Tuesday 4 July 2017

स्वराज्याचे तोरण




स्वराज्याचे तोरण तोरणा गड  

रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली,पण केवढे अवघड कार्य होते ते, दिल्लीचा मुगल बादशाह,विजापूरचा आदिलशाही सुलतान,गोव्याचे पोर्तुगीझ आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर  हुकूमत गाजवत होत्याया सत्तांचा दरारा  मोठा होतात्यांच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिम्मत नव्हतीअशा  बिकट परीस्तीथत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र  उच्चारला होताकुठे शत्रूच्याफौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ पण शिवरायांचा निश्चय अढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले.शिवरायांकडे पुणे,सुपे,चाकण इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधीकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य, ज्याचे किल्ले त्याचे राज्य, किल्ला  ताब्यात असला,कि आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम  किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे,असे शिवरायांनी मनाशी ठरवले. तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता. पुण्याच्या नैऋत्येस चौसष्ठ किलोमीटरवर कानद खोऱ्यात  हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका



त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरीत्या सपाट झालेल्या भागांची तटबंदी. झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहेलढाऊ आहेकिल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकाच वाट आहेती आहे झुंजारमाचीवरूनहि वाट अतिशय अवघड आहे.वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार ! महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातोकिल्ल्यावर तोरनजाई देवीचे देऊळ आहेत्यावरून त्या किल्ल्याला तोरणा 'हे नाव पडलेएवढा प्रचंड किल्ला ! पण आदिलशाहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हतेकिल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते,कि दारुगोळा नव्हताशिवरायांनी हे हेरलेशिवरायांना नेमके हेच हवे होतेतोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे,असे त्यांनी ठरवलेनिवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शीवराय कानद खोऱ्यात उतरलेसाऱ्या मावळ्यांसह ते सिहाच्या छातीने  हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेलेमावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्यातानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्याचे निशाण उभारलेयेसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावाण सहकारीत्याने चौकीवर पहारे बसवलेकिल्ला ताब्यात आलासर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला

हिंदवी स्वराज्याची नौबत झडली.नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमलाशिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगडअसे नाव दिले.तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरु झालात्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केलीकिल्ल्यावर मराठा किल्लेदारब्राह्मण सबनीसप्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्याशिबंदीत मावळे,कोळी,रामोशी,महार इत्यादी जातीजमातीतील शूर माणसे नेमली स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद,वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हताकिल्ल्याची दुरुस्ती सुरु झाली आणि काय आश्चर्य  मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरीकाम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या  कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला.'शिवरायांना देवी भवानी प्रसन्नआहे,तिनेच धन दिले 'असे जो तो म्हणू लागलाकामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनांच्या घागरी शिवरायांजवळ आणून  दिल्याएका मोहोरेलाही  कुणी हात लावला नाहीस्वराज्याचे धन होते ते  ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केलेस्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आलाआपल्या कार्याला आईभवानीचा आशीर्वाद आहे, असे त्यांना वाटले.हे धन स्वराज्याच्या कामी आलेया धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतलीदारुगोळा जमा केला.उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्यास ठरवलेतो बेत असातोरण्यापासून पंधरा किलोमीटरवरपूर्वेला मुरुंबदेवाचा डोंगर आहे

शिवरायांनी तो हेरून ठेवला होताहा डोंगर खुप उंच,अवघड आणि मोक्याचा होताआदिलशाहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होताया किल्ल्यावरही पहारा ढिलाच होतातेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शीवरायांनी ठरवले.एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतलातोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंबदेवाच्या डागडुजीसाठी खर्च झालेशिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले 'राजगडगडावर पाथरवटांनी दगड घडवलेलोहाराने भाता फुंकलासुतार ,गवंडी ,मजूरभिस्ती अशी सारी माणसे कामाला लागलीराजवाडा,बारा महाल,अठरा कारखाने आणि राजगादी तयार झालीराजगड हि स्वराज्याची पहिली राजधानी सजलीशिवरायांची घोडदौड सुरु झालीबारा मावळांतील किल्ल्यामागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतलेबारा मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आलागावोगावचे पाटील,देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले ;परंतु तांदळात जसे काही खडे असतात,तसे मावळातही काही दुष्ट लोक होतेशिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागलेशिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्याठाणेदाराने विजापूरला सांडणीस्वार पाठवून शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली



No comments:

Post a Comment