Monday 10 July 2017

दर्यातील देवमासा दौलतखान





 दौलतखान चा पराक्रम 

शिवाजीराजे महाबळेशवरच्या एका उंच कडेपठारावरून सभोवतालचा परिसर न्याहाळत असताना,नारळ पोकळीच्या बागा,सागरकिनारा यांनी शोभून दिसणारा कोकण किनारपट्टीने महाराजांचे लक्ष वेधून घेतले. त्या ठिकाणी मायनायक भंडारी,बाळशास्त्री जोशी,कोळी आणि आणखी काही मंडळींची शिवरायांनी भेट घेतली. इंग्रज,पोर्तुगीज आणि सिद्दी या लोकांच्या हुकुमतीमुळे कोकण किनारपट्टी असुरक्षित आहे. आणि तेथील लोकांचे जगणे अवघड झाले आहे.,तिथल्या आया-बहिणींची अब्रू धोक्यात आहे,यावर महाराजांनी काही उपाय करावा अशी त्यांनी विनंती केली. राजांच्या पारखी नजरेने तेथील लोकांचे म्हणणे जाणले कि मायनायकाला त्या भागातील अडीअडचणींची,गरजांची,सागरांची चांगलीच माहिती आहे. हा महाराष्ट्र जर एका भगव्या झेंड्याखाली आणायचा असेल तर ह्याच कोकणी माणसांना हाताशी धरून दर्यावर आपले सागरी आरमार उभं करायला हवं. या इंग्रज,पोर्तुगीज आणि सिद्द्दी हयांना वेळीच आवरायला हवे. पण हे जमणार कसे ? हा विचार करत असताना शिवरायांना एकदम काहीतरी आठवले. आणि त्यांनीही विचारले,''तुमच्यात दौलतखान म्हणून कुणीतरी आहे ना तो दिसत नाही, तेव्हा मायनायकेने सांगितले कि ''राजे दौलतखान एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर त्यांचा अंगरक्षक म्हणून गेला आहे. दौलतखान आपला तांडेलांचा तांडा घेऊन गेला आहे



त्याचा या 'तिघांवर' मोठा वचक आहे. हि माहिती मिळताच महाराज म्हणाले,''माय-नायके,तुम्ही सागर किनाऱ्यावर आमचे आरमार उभे करण्याची जबाबदारी घ्या. आणि दौलतखानला तुमच्या मदतीला घ्या. आम्हाला उत्तम विश्वासू आणि निष्ठावंत माणसांची सदैव गरज आहे. महाराजांनी विश्वास दाखवला. आणि पैशांची तरतूद केली,मदत केली आणि मदत मागितली. थोड्याच दिवसात मायनायक भंडारी,आणि त्याचे सहकारी यांनी राजांचे स्वप्न सत्यात आणले. आणि कोकणच्या सागरी किनाऱ्यावर राजांचे सागरी आरमार उभे राहिले. त्या आरमाराने उत्तर-दक्षिण भाग काबूत घेतला. रघुनाथपंथ अत्रे ह्यांनी दाभोळ बंदर काबीज केले. मोरोपंतांनी जंजिरा,त्या सोबत विजय दुर्ग, सुवर्ण दुर्ग, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपली बळकट आरमारी स्थाने तयार केली. आपल्या सांगण्याप्रमाणे मायनायक भंडारी,आणि त्याचे साथीदार,इतर स्वामिनिष्ठ मंडळींनी सुसज्ज केलेले ते आरमार पाहण्यासाठी राजे स्वतः आले तेव्हा त्यांनी प्रथम आपल्या आरमाराचे अवलोकन केले ते सिंधेदुर्गावरून. राजे सागरी किनाऱ्यावर येताच अनेक तांडेलांनी महाराजांचा जयजयकार केला. एका मचव्यांतून मायनायके राजांना घेऊन पहिल्या सागरी जहाजाजवळ गेला. तांडेलांनी शिड्या खाली सोडल्या. त्यावरून मंडळी मोठ्या जहाजावर गेली. तेथून समोरच्या अथांग सागराचे दर्शन घेत असतानाच सुकाणू जवळ उभी असलेली एक व्यक्ती महाराजांच्या नजरेत भरली. कोण होता तो सडसडीत बांध्याचा,बलदंड बाहुंचा,वीतभर दाढी असलेला रांगडा गडी दौलतखान. त्याची आणि महाराजांची नजरानजर होताच मोठ्या विनयने त्याने महाराजांना सलाम ठोकला. त्याचबरोबर भंडारी गराजला,''अरे दौलत्या,राजांना सलाम कायला करतोस. मुजरा कर.'' त्यावर मोठ्या आदबीन दौलतखान म्हणाला,''माफी करो महाराज ''अरे माफी कसली मागताआजवर आम्ही तुमचं नाव आणि पराक्रम ऐकला होता

आता भेट तर झालीच पण अजून तुमचा पराक्रम पाहायचा आहे.'' असे म्हणून महाराजांनी सागराला पहिला मानाचा नारळही त्या दौलतखानाच्या हातूनच अर्पण करवला. सागराला नारळ अर्पण केला. प्रार्थना केली,वंदन केलं ... आणि सर्वजण एकेका जहाजावर चढताच,राजे,सैन्य,दारुगोळा,तोफा,तिरंदाज ह्यांनी सज्ज झालेली राजांची आरमारी फौज सागरी लाटांवरून पुढे पुढे निघाली. या मोहिमेतील राजांचे लक्ष होते ती बसनूरची बाजारपेठ. स्वराज्याच्या कामी एक एक दुर्ग हाती मिळवताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात दारुगोळा शस्त्रास्त्रे यावर खर्च झाला होता. दौलत उभी करणे हे गरजेचे होते. त्यासाठी यावेळी गोव्याच्या दक्षिणेस कारवार जवळच्या बसनूर बाजारपेठेचे लक्ष ठरविण्यात आले होते. कारण गोरगरिबांचे घामाचे धन  लुटणारी, अमाप धन कमावणारी,अधर्म-अत्याचार करणारी मोठमोठी मंडळी या गावात होती. त्यांना चांगला धडा शिकवायचा होता. या सागरी मोहिमेसाठी आता महाराजांबरोबर मायनायक भंडारे,अनेक तांडेल,मराठी फौज आणि मुख्य म्हणजे दर्यासागरात एक लाखमोलाचा देवमासा दौलतखान हा त्यांच्याबरोबर होता. या सागरी प्रवासातल्या एका कठीण प्रसंगी राजांना दौलतखानची नजर,त्याचे सागरी आराखडे यांची कल्पना आली. तसेच आपटी म्हणजे पाण्यातला पाषाण आणि उफली म्हणजे सागरातील प्रचंड मोठी पाण्याची लाट हे पण दौलतखानाकडूनच राजांना कळले. राजांना त्याचे मोठे कौतुक वाटले. गोव्यामार्गे महाराजांचे सागरी आरमार हे बसनूरच्या खाडीत शिरले. नांगर टाकून गलबते,संग्रमीया म्हणजे लढाऊ जहाजे खाडीत थांबवली

राजांच्या सूचना ऐकून घेऊन इशारा मिळताच आरमारी फौज बसनूर मध्ये घुसली. त्यावेळी सारेजण झोपेत होते. ''तोच हर हर  महादेव '' च्या गर्जना घुमल्या. एका हाती मशाल आणि दुसऱ्या हाती नंग्या तलवारी घेऊन सैन्याने महत्वाच्या ठाण्यावर हमला केला. पहारेकऱ्यांनी मुख्य ठाणेदाराला वर्दी दिली. ठाणेदार या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पार घाबरला. पण स्वतःला सावरत त्याने सशस्त्र सैन्यासह मराठी फौजेवर प्रतिहल्ला केला. तेवढ्यात दौलतखानाने सपासप वार करून ठाणेदाराची सौरक्षण फळी फोडली. त्यांच्यावर झडप घातली. आणि ठाणेदाराला जेरबंद केले. इकडे इतर सैन्याने बसनूरची बाजारपेठ,मोठमोठे वाडे,धनिकांच्या तिजोऱ्या फोडल्या,तोडल्या आणि मोठी डौलात हाशील करून ती जहाजावर चढवली. महाराजांची नियोजन पूर्वक केलेली हि सागरी मोहीम फत्ते झाली. त्यात जडजवाहीर,सोनेनाणे,पैका,दागदागिने,कपडा,धान्य,मौल्यवान वस्तू,अशा अनेक वस्तू हाती लागल्याया यशस्वी कामगिरीबद्दल राजांनी सर्व तांडेल,भंडारे,दौलतखान आदींचा गौरव केला. कोकण किनाऱ्याची जबाबदारी प्रामुख्याने दौलतखान याच्यावर सोपवून राजे जमिनीच्या मार्गाने पुन्हा आपल्या मुलखाकडे परतले. महाराजांनी दिलेली जबाबदरी पार पाडत असताना,दर्या किनाऱ्याच संरक्षण करत असताना,एकदा दौलतखानचा सिद्दी संबूळ याच्याशी सामना झाला. सागरावर राज्य करू पाहणाऱ्या शिवरायांच्या सागरी आरमाराचे मुख्य तीन शत्रू होते

ते म्हणजे सिद्दी कासीम,सिद्दी संबूळ,आणि सिद्दी खैरीयत. या तिघांच्या भरीला इंग्रज,डच,पोर्तुगीज . मंडळी होतीच. पण त्या सर्वांना पुरून उरत होता तो शिवरायांचा एकनिष्ठ सेवक दौलतखान. सिद्दी संबूळ बरोबरच्या सरळ युद्धात दौलतखान याने सिद्दीला पार जेरीस नेले. पुरते नमवले. त्याला पराभूत करून जंजिऱ्यास परत जायला लावले. त्यामुळे सिद्दी संभुळ दुखावला. त्याच्यावर दुसरा आघात झाला तो त्याच्याच माणसांकडून. तो म्हणजे सिद्दी कासीम. आणि सिद्दी खैरियात. त्यांनी त्याच्याविरुद्ध औरंगजेब बादशहाचे कान भरले. आणि त्याला एकटा पाडला.... पण जेव्हा हि बातमी दौलतखानच्या कानी पडली तेव्हा दौलतखानला राहावले  नाही. एकेवेळी आपण परस्परांचे शत्रू होऊन लढलो होतो. आपण सिद्दी शंभुळला पराभूत करून पळवून लावले होते. तो आपला शत्रू आहे. मुसलमान आहे. ह्या साऱ्या गोष्टी विसरून दौलतखान हा सिद्दीच्या मदतीला धावून गेला. त्यावेळी प्रथम सिद्दी संभुळ याला मोठे आश्चर्य वाटले. त्याने मदतीचा हात करणाऱ्या दौलतखानला प्रश्न विचारला,''खान,हंम तो एक दुसरेके दुश्मन होते हुए भी आप हमे मदत कारणा चाहते हो. कयू त्यावर दौलतखान म्हणाला, ''सिद्दी जब तुम हमारे साथ लढणे आए थे,तब तुम हमारे दुश्मन थे।

लेकिन अभि नही। अभि तुम खुद्द बेसहारा हो। तुम्हे मदत कि जरुरत है। और आप को मदत कारणा हमारा फर्ज है। ये हमारी इन्सानियत है। सिद्दी संभुळ ने ते शब्द ऐकले आणि आश्चर्याने दौलतखानकडे पहिले आणि म्हणाला, भाईजान,ये प्यार,ये इन्सानियत... ''सिद्दी,भाई,ये प्यार,हे इन्सानियत हमने हमारे शिवाजीराजासे सिखी है। शिवाजी राजा दिल का बडा साफ है, दिलदार है, जो किसीको भी उसके जात धर्म से नही,बल्की अच्छे बुरे काम और नियत से आपना पराया मानता है। हमने तो यही सिखा है। कि ऊस कि नजर से तो वही सच्चा दुश्मन है जो हमारे मुल्कपार हमला करता है। चाहे वो हिंदू हो,मुसलमान हो,अंग्रेज हो,फिरंगी हो या कोई भी। दौलतखानच्या शाब्दांतून त्यांच शिवाजी राजांवरच प्रेम,आदर, श्रद्धा व्यक्त होताना पाहून सिद्दी संबुळ भारावला. तोच दौलत खान याने सिद्दी संभुळला विचारले,बोलो सिद्दी कि तुम हमारे आरमार मे आणा और हमारे साथ एक भला काम कारणा पसंद करोगे'' आणि दौलतखानच्या या प्रस्तावाला मान्यता देत सिद्दी संभळ दौलतखानच्या आरमारात सामील झाला. अशा अनेक चांगल्या कामगिऱ्या करून दौलतखानने महाराजांची आणि स्वराज्याची,भगव्या झेंड्याची सेवा करीत आणि त्यांच्याशी इमान राखत आपले नाव इतिहासाच्या पानावर नोंद करून ठेवले.






No comments:

Post a Comment